जोपर्यंत सुरक्षित समृद्ध आनंदी निरोगी समाज निर्माण होत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील : सुरेश खोपडे
नगर (दि.18) : सीएए, एन.आर.सी, एनपीआर हा कायदा हिंदू व मुसलमान मध्ये फूट पाडण्याकरिता आणला गेला आहे. जोपर्यंत देशात सुरक्षित समृद्ध आनंदी निरोगी समाज निर्माण होत नाही तोपर्यंत हा शाह्रीन बागचा लढा चालू ठेवावा लागेल, असे प्रतिपादन निवृत्त पोलिस अधिकारी सुरेश खोपडे यांनी केले.
अहमदनगर संविधान बचाव समितीने फकीरवाडा येथे आयोजित केलेल्या तीन दिवसीय शाहीन बागच्या आंदोलनाच्या दुसर्या दिवसाच्या धरणे आंदोलन कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सुरेश खोपडे बोलत होते .पुढे ते म्हणाले की ज्या समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होते तो समाज प्रगतीपासून वंचित राहतो याचे कारण सांगताना त्यांनी भिवंडी दंगलीची उदाहरणे दिली. भिवंडी येथील दंगल सांगताना त्यांनी अनुभवलेल्या दंगलीची कारणे, दंगलीचे हेतू, दंगलींमध्ये होणारा राजकीय फायदा व दंगलीला बळी पडणारे निरपराध नागरिक यांचा उल्लेख करताना भावी पिढीला सुरक्षित समृद्ध आणि आनंदी समाजाची निर्मिती करण्याकरिता या आंदोलनाचा उपयोग होणार आहे देशातील सीए ए व एन आर सी चा कायदा रद्द करण्यासाठी या देशातील फक्त मुस्लिमच नाही तर आदिवासी एससी एसटी, ओबीसी समाजातील बांधव या सर्वांनी एकत्रित येऊन हा लढा दिला पाहिजे .या माता भगिनींनी दाखवलेले धैर्य हे इस्लाम व कुराणाची शिकवण आहे . कुरआनने अन्यायाविरुद्ध लढण्याचा संदेश दिला आहे आज या माता भगिनींनी देशासमोर आदर्श उभा केला आहे याचा निश्चितच समाजाला सकारात्मक दिशेने नेण्यासाठी उपयोग होईल असा आशावाद सुरेश खोपडे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केला.
पुणे येथील गांधी भवनचे संदीप बर्वे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. त्यांनी सीएए व एन आर सी हा कायदा फक्त मुस्लिमांच्याच विरोधात नसून तो सर्व भारतीयांच्या विरोधात आहे तो देशाच्या संविधानाच्या प्रिअंबल चा भंग करतो. त्यामुळे ही लढाई फक्त मुस्लिमांची नसून सर्व संविधान प्रेमी भारतीय नागरिकांची आहे . माझे नाव संदीप बर्वेआहे मी हिंदु आहे परंतु माझा या कायद्याला विरोध आहे आणि त्यासाठीच मी या ठिकाणी आज या माता-भगिनी आयोजित केलेल्या शाहिन बाग च्या आंदोलनात सहभागी झालो आहे.
