प्राथमिक शिक्षक बँकेला दोन पुरस्कार


नगर (दि.12) : जिल्ह्यातील शिक्षकांची कामधेनू असलेल्या जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड या शिखर संस्थेतर्फे पगारदार नोकरांची सर्वोत्कृष्ट नागरी सहकारी बँक तसेच शतकोत्तर वाटचाल करणारी बँक म्हणून दोन पुरस्कार उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते देऊन मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिरात सोमवारी गौरव करण्यात आले.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते. हा पुरस्कार बँकेचे वतीने गुरुमाउली मंडळाचे नेते व जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे, बँकेचे चेअरमन संतोष दुसुंगे, व्हाईस चेअरमन नानासाहेब बडाख, शताब्दी महोत्सव समितीचे अध्यक्ष सलीमखान पठाण, संचालक अविनाश निंभोरे व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण देशमुख यांनी स्वीकारला.

शिक्षक बँकेने शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करताना एक हजार कोटींच्या ठेवीचा टप्पा ओलांडला आहे. ही बँक महाराष्ट्रातील एकमेव पगारदार नोकरांची नागरी सहकारी बँक असल्याचे फेडरेशनचे कार्याध्यक्ष मुकुंद कळमकर यांनी सांगितले. राज्यातील पगारदार नोकरांची उत्कृष्ट बँक म्हणून एकमेव शिक्षक बँकेची राज्यभरातून निवड झाली. शिक्षक बँकेला राज्य बँक असोसिएशनचे मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे संचालक मंडळ, तसेच सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदनही या वेळी करण्यात आले.

शिक्षक बँकेला राज्य बँक असोसिएशनचे मानाचे दोन पुरस्कार मिळाल्याबद्दल बँकेचे संचालक मंडळ तसेच सर्व कर्मचारी यांचे शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, शिक्षक संघ व गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब तांबे ,प्रवीण ठुबे, अरुण आवारी,निळकंठ घायतडक ,राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट,महिला आघाडीच्या विद्याताई आढाव, मिनाक्षी तांबे,मिनाक्षी अवचरे,संगीता कुरकुटे,सत्यवान मेहेरे,ना.चि.शिंदे,बाबा पवार,रमेश साबळे, राम निकम,बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे,संदिप मोटे,मच्छिंद्र लोखंडे,बाळासाहेब तापकीर, रामेश्वर चोपडे,अल्ताफ शाह,संभाजी आढाव,महिला आघाडीच्या अंजली मुळे,सुजाता पुरी, नर्गिस ईनामदार,मिनाज शेख,राजकुमार साळवे,बाळासाहेब चाबुकस्वार,राजु इनामदार, जगन्नाथ विश्वास,दिपक बोऱ्हाडे, बेनहर वैरागर, मोहमद बदर शेख , हनिफ शेख ,भाऊराव राहिंज,रमेश दरेकर,सयाजीराव रहाणे, पी.डी.सोनवणे,लक्ष्मण सोनवणे, विठ्ठल काकडे, कैलास गिते,मिलिंद तनपुरे, विजय ठाणगे,किशोर माकुडे आदींनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post