अहिंसा चौक ते आनंदधाम चौक पे ऍण्ड पार्कला विरोध : चोपडा


 

।  अहिल्यानगर । 03 फेब्रुवारी 2026 । महापालिकेने पे ऍण्ड पार्क प्रस्तावित केले आहे. अहिंसा चौक ते आनंदधाम चौक येथे चार चाकी व दुचाकीसाठी प्रस्तावित पे ऍण्ड पार्क करण्यास माझा विरोध आहे, असे निवेदन राष्ट्रवादीच्या नगरसेविका मीना चोपडा यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आनंदधाम येथे जैन समाजाचे राष्ट्रसंत आनंदऋषीजी म.सा. यांची समाधी आहे. देशभरातून लाखो भाविक याठिकाणी भेट देतात तसेच प्रार्थना, दर्शन, व्याख्यान, उठावणा तसेच इतर धार्मिक कार्यक्रम होत आहेत. पे ऍण्ड पार्कबाबत शहरातील बर्‍याच लोकांनी व धर्मगुरूंनी नाराजी व्यक्त केली आहे. येथे पे ऍण्ड पार्क केल्यास रोज वाद होऊन धर्मस्थळास आवश्यक असलेल्या शांततेचा भंग होऊ शकतो. 

त्यामुळे नागरिकांच्या भावनांचा विचार करून असा अन्यायकारक निर्णय घेऊ नये, अहिंसा चौक ते आनंदधाम चौक व आनंदधाम चौक ते माजी खासदार स्व. दिलीप गांधी यांच्या निवासस्थानापर्यंत चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी प्रस्तावित पे ऍण्ड पार्क करू नये, असे चोपडा यांनी निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post