पल्लवी दराडे यांची बदली


पल्लवी दराडे यांची बदली
 
 मुंबई  (दि.14) : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पल्लवी दराडे यांची बुधवारी अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदावरून बदली करण्यात आली. त्यांच्या जागी मदत आणि पुनर्वसन विभागाचे सहसचिव ए. बी. उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे

पल्लवी दराडे या भारतीय महसूल सेवेतील अधिकारी आहेत. तरीही फडणवीस यांनी त्यांना मुंबई महापालिका, त्यानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागात नियुक्ती दिली होती. सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. त्यानुसार पशुसंवर्धन आयुक्त लक्ष्मी नारायण मिश्रा यांची बदली रत्नागिरी जिल्हाधिकारीपदी झाली आहे. पवनीत कौर यांची बदली आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे येथे करण्यात आली आहे, तर वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक डॉ.माधवी खोडे चवरे यांना जळगाव महापालिकेच्या आयुक्तपदी नेमण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post