सावेडीत महावीर मलखांब & योगा ट्रेनिंग सेंटरचा ९ वा वर्धापन दिन संपन्न



सावेडीत महावीर मलखांब & योगा ट्रेनिंग सेंटरचा ९ वा वर्धापन दिन संपन्न

नगर (दि.15 ) : श्री रामावतार मानधना चारीटेबल ट्रस्ट संचलित महावीर मलखांब & योगा ट्रेनिंग सेंटर  (एमएमवायटीसी)चा ९ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा झाला, या निम्मित विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी  उद्योजक  श्रीगोपाल धूत होते, तर  प्रमुख पाहुणे शिक्षणतज्ञ्  शरद  कोलते एरियल सिल्क असो ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  सतीश जाधव (मुबई), उद्योजक  श्यामशेठ सारडा, श्री रामावतार मानधना चारीटेबल ट्रस्टचे मोहन मानधना, पराग  मानधना, सौ कोमल मानधना, अनिल उत्पात, एमएमवायटीसीचे प्रशिक्षक उमेश झोटिंग, प्रणिता तरोटे आप्पा लाडाने, ऋतुजा गीते, ऋतुजा वाल्हेकर, अक्षता गुंड पाटील आदीसह मोठ्या संख्येने मान्यवर, विद्यार्थी, खेळाडू पालक व नागरिक उपस्थित होते.

श्रीगोपाल धूत म्हणाले,  मानधना ट्रस्ट मेडिकल, शैक्षणिक,धार्मिक क्षेत्रात काम करत होती. आता २ वर्षपासून क्रीडा क्षेत्रात काम करत आहे.  मुलावर धार्मिक बरोबरच मैदानी संस्कार होण्यासाठी त्यांनी या  सेन्टरला जागा व सोयी उपलबद्ध  करून दिल्या आहेत. यामुळे नवीन पिढी सोशल मीडिया पासून दूर राहून नक्कीच सदृढ बनेल यात शंका नाही असे सांगून त्यांनी मानधना ट्रस्टचे व  एमएमवायटीसी कौतुक केले.

ते पुढे म्हणाले मल्लखांब सारख्या देशी खेळ या ठिकाणी सुमारे १७५ मुले- मुले शिकतात याबद्दल मला आनंद वाटला देशी खेळांना आपण प्रोत्साहन दिले पाहिजे, कारण जग आता योगा करायला लागले आहेव आपण आपल्या खेळामध्ये मागे राहायला नको.
 
कोलते म्हणाले लहान मुलांची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून खुप चांगले वाटले,नगर शहरात असे  पण सेंटर आहे जिथे एवढे विद्यार्थी एकाचवेळेच इतकी चांगली प्रात्यक्षिके करतात हे आज पहिले यामुळे मुले धीट होतील व खेळामुळे अभ्यासात पण हुशार होतील ,रोजच्या सरावामुळे खेळाडूंना शारीरिक फिटनेस बरोबर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचे धर्य मिळते,

मानधना यांनी ट्रस्टची माहिती देऊन ते म्हणाले रोपमल्लखांब,योगा,सिल्क योगा,मल्लखांबमुळे मानसिक व शारीरिक फिटनेस राहतो त्यामुळे सर्वानी हे केले पाहिजे एमएमवायटीसीचा खेळाडू घडविण्यात व पदके मिळवण्यात मानधना ट्रस्टचा वाटा आहे याचा मनस्वी आनंद होत आहे

सतीश जाधव म्हणाले ग्रामीण भागात एरियल सिल्कचा प्रचार व प्रसार एमएमवायटीसी मुळे चांगला झाला आहे नगरमध्ये मल्लखांब ,योगा,एरियल सिल्क ला यामुळे चांगले  वातावरतं तयार झाले आहे येथे  २०० च्या वर मुले- मुली येतात हे कौतुकास्पद आहे, 

उमेश झोटिंग यांनी सेंटरची माहिती दिली ते म्हणाले मागील वर्षात विविध स्तरावर राज्य व राष्ट्रीय पातळीवर ६०च्या वर पारितोषिके मिळाली आहे,तर सेन्टरला श्री रामअवतार मानधना चॅरिटेबल ट्रस्ट मोठे सहकार्य आहे

प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले व नंतर  या कार्यक्रमात सुमारे दीडशे मुलांनी योगा, मल्लखांब, आणि एरियल सिल्कचे चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर केले व   उपस्थितीतांचीं मने जिकली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्षितिजा हडप यांनी तर आभार प्रणिता तरोटे यांनी मानले

Post a Comment

Previous Post Next Post