'जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस सावली निराधार संस्थेत सामाजिक उपक्रम राबवून साजरा'



'शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर यांचा पुढाकार'

'जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा वाढदिवस सावली निराधार संस्थेत सामाजिक उपक्रम राबवून साजरा'

नगर (दि.16) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदामंत्री नामदार जयंत पाटील यांचा वाढदिवसा निमित केडगाव येथीलसावली निराधार संस्थेतील निराधार वंचित मुलांना फळे, मिठाई वाटप करून तेलडबे देण्यात आले व खाद्य उपयोगी वस्तूही सावली संस्थेस भेट देण्यात आल्या.मा.जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना आपला वाढदिवस डामडौल व अवास्तव खर्च करून साजरा करू नये अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत.

या पार्श्‍वभूमीवर जयंत पाटील यांचे राज्यातील खंदे अनुयायी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांनी शिवप्रहार संघटनेच्या आपल्या समर्थक कार्यकर्त्यांसह पुढाकार घेऊन पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला उपस्थित कार्यकर्त्यांनी संस्थेतील विद्यार्थ्यांमध्ये मिसळून एकरूप होत त्यांची सहानुभूतीपूर्वक विचारपूस करून संवाद साधला.जयंत पाटील यांच्यासारख्या अभ्यासू व कर्तबगार नेतृत्वाच्या कार्यातून प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनीही अडचणीच्या परिस्थितीला तोंड देत आपलं जीवन समृद्ध करावे व जीवनात यशस्वी व्हावे असा संदेश संजीव भोर यांनी यावेळी दिला.यावेळी उपस्थित सर्व मुलामुलींनी व कार्यकर्त्यांनी आमदार जयंत पाटील यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांना संबोधित करताना संजीव भोर पुढे म्हणाले,कुठलाही भपकेबाजपणा व अनाठायी खर्च न करता आपल्या नेत्याचा वाढदिवस सावली सारख्या निराधारांच्या संस्थेत सामाजिक उपक्रम राबवून साजरा केल्याने निश्चित समाधान मिळते,आपला आनंदाचा क्षण गरजू विद्यार्थ्यांमध्ये जाऊन निश्चितच द्विगुणित करता येतो.या चांगल्या उपक्रमाबद्दल सावली संस्थेचे संचालक नितेश बनसोडे यांनी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर व त्यांच्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांचे कौतुक करीत समाजकार्यात ते नेहमी पुढे राहत असल्याबद्दल धन्यवाद दिले व सर्वांचे आभार मानले.

       यावेळी शिवप्रहार संघटनेचे संदीप संसारे,प्रशांत लवांडे,सोमनाथ माने,संजय भोर,मच्छिंद्र कोहक,संपत दरेकर, अण्णा भोर, विकास घोडके, बंडू गोळे, अमित वैद्य, विकास शिर्के, मच्छिंद्र हराळ, बाबू भोर, सोनू शेवाळे, विजय भोर, सागर चौधरी, अमोल कोहक, संग्राम शिंगोटे, अजित भोर, आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post