बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत युगपुरुष : अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर

बुद्धीप्रामाण्यवादी विचारवंत युगपुरुष : अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर
     युगपुरुष : अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर यांनी वैचारिक क्षेत्रात व सामाजिक क्षेत्रात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले आहे. त्यांचे जीवन विचार, साहित्य, चळवळी यामधून त्यांची वैचारिक श्रीमंती वारंवार प्रत्ययास येते. ते बोलके व दिखाऊ विचारवंत नाही तर विचार जगणारे विचारवंत आहे.त्यांचे व्याख्यान,साहित्य, वैचारिक व ऐतिहासिक ग्रंथ, सामाजिक कार्य, सदैव, शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीत कार्य करणार्‍याना प्रेरणा देते. कसलाही मुलाहिजा न बाळगता बेधडकपणे प्रतिगामीत्वाचा बुरखा फाडण्याचा त्यांचा स्वभाव ही त्यांच्या जीवनातील जमेची बाजू आहे.केवळ टीका करणार्यांची  सदैव भूमिका पार पाडणे असे लेखन आणि वक्तव्य त्यांचे नाही.तर आसूड ओढत असताना समर्थ पर्यायही ते लगेच देतात.
युगपुरुष अ‍ॅड.पुरुषोत्तम खेडेकर ही व्यक्ती मळलेल्या वाटेवर चालणारी नाही. हा स्वतंत्र प्रज्ञेचा मनस्वी माणूस आहे. कवी, लेखक, विचारवंत, वक्ता म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.ते बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे स्वामी आहे. प्रज्ञावंत व प्रतिभावंत आहे.आपल्या आयुष्याची मशाल पेटवून ते सभोवतालचा प्रदेश उजळण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे.समाजपरिवर्तनासाठी ते आपली वाणी व लेखणी झिजवत आहे.त्यांचे संबंध आयुष्य म्हणजे एक झंझावात आहे. जिजाऊ, शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची समतेची विचारधारा ते आयुष्यभर जपत आहे.या विचारांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी ते अखंडपणे आपल्या वाणीचा,लेखणीचा आग्रह पूर्वक वापर करतात. मते परखडपणे मांडण्यात त्यांचा हातखंडा आहे.त्यामुळे बहूसंख्य तरुण मंडळी त्यांच्या सहवासात येतात.आणि झपाटून जातात.पुरोगामी विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आवश्यक असलेली उच्च दर्जाची प्रतिभा त्यांच्याकडे आहे. काव्य असो वैचारिक लेखन,प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांनी आपल्या विचारांचा ठसा उमटवला आहे.समतेची भूमिका मांडताना त्यांना नाना प्रकारच्या संघर्षाला तोंड द्यावे लागते,तरीदेखील त्याची ते पर्वा करीत नाही.त्यांची व्याख्याने व ग्रंथ,चळवळीच्या दृष्टीने संजीवनी आहेत.भारतीय समाजाच्या अनेक समस्यावर पोटतिडकीने आणि प्रखरपणे ते बोलतात.त्यामुळे त्यांनी अनेकदा काहीजणांची नाराजी,शत्रुत्व ओढवून घेतले पण आपला वैचारिक प्रवास खंडित होऊ दिला नाही.ते बांधकाम क्षेत्रात अधिकारी या नात्यानेही त्यांनी आपल्या क्षेत्रासाठी व  सर्वसामान्य बहुजनांसाठी सदैव क्रियाशील सहभाग दिला.त्याचबरोबर समाजरचनेचा आणि संस्कृतीचा अभ्यास केला.विविध समाजाच्या तुलनात्मक अभ्यासामुळे त्यांच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या.त्यामुळे त्याचा चळवळीला खूप उपयोग होत आहे.
’वेदा’ ला ’भेद’ म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी साहित्याची परीभाषा बदलली.नव्या मूल्यांचे अखंड दिले. समाज परिवर्तनाची दिशा दिली.नवा विचार दिला.यासाठी वेगळी व्यवस्था निर्माण केली.या व्यवस्थेला छ. शाहू महाराजांनी बळ दिलं.तथागत बुद्ध, कबीर,फुले आणि शाहू महाराज यांचा परिपक्व विचार घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कार्य केले.या प्रेरणेने जी साहित्यसंपदा जन्माला आली आणि जे कवी, लेखक, विचारवंत, अभ्यासक, सामाजिक कार्यकर्ते,उदयाला आले त्या परंपरेतील एक महत्त्वाचं व अग्रगण्य नाव म्हणजे ड.पुरुषोत्तम खेडेकर होय.
पूस्तक हेच माणसाचे मस्तक संपन्न करते यावर  त्यांची अपार श्रद्धा आहे.संपन्न झालेले मस्तक कुणाचेही हस्तक होत नाहीत. हे ओघाने आलेच. हा विचार करत असताना केवळ विचार सांगून जमत नाही तर त्याला कृतीची जोड असावी लागते. हे सर्व ड.पुरुषोत्तम खेडेकर यांच्याकडे आहे. म्हणून तर ते समतेचा विचार संबंध महाराष्ट्रभरच नव्हे तर जगभर फिरून सांगू शकतात. या पाठीमागे केवळ एकच ध्यास आहे. तो समतेचा व लोकल्याणाचा.
यातून एक गोष्ट स्पष्ट होते की, तथागत बुद्धाच्या वैचारिक चक्राला आधुनिक गती मिळाली,त्यातून मानवधर्म संपन्न झाला.मीच माझ्या आयुष्याचा शिल्पकार होऊ शकतो.असा सार्थ आत्मविश्‍वास निर्माण झाला.आपल्याच प्रकाश मार्गात आपण मार्गक्रमण करू शकतो.याची खात्री पटली. त्याच मार्गाचे युगपुरुष : अ‍ॅड..पुरुषोत्तम खेडेकर साहेब पाईक ठरतात.या परिवर्तनाच्या चक्राशी आपलं नातं जोडतात.आणि सबंध आयुष्य या परिवर्तनाच्या चक्राला आपल्या बौद्धिक क्षमता देण्याच काम करतात. म्हणून वाटतं युगपुरूष : अ‍ॅड. पुरूषोत्तम खेडेकर साहेब परिवर्तनाच्या चक्राचे केवळ पाईक नाहीत तर सम्यक दृष्टी लाभलेले बुद्धिप्रामाण्यवादी विचारवंत, युगपुरुष आहेत.
त्यांनी 1990 ला मराठा सेवा संघ आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने तेहतीस कक्षाची स्थापना करून त्यांनी जे कार्य केले. त्या कार्याला सलामच आहे. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही जिजाऊ चरणी प्रार्थना.
      आज त्यांचा जन्मदिवस या जन्मदिवसानिमित्त त्यांना खूप खूप सदिच्छा!
               डॉ. शिवानंद भानुसे   
                    औरंगाबाद
                    4-1-2020

Post a Comment

Previous Post Next Post