नगर दि.03 - पोलीस बॅन्डची शानदार धून, महाराष्ट्रीय ग्रामीण पारंपरिक संगीताची मोहिनी, राजस्थानी नृत्याच्या ठेक्यावर आणि खेळाडूंच्या शानदार संचलनाने 65 व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेचा शुक्रवारी दिमाखदार प्रारंभ झाला. प्रत्येक खेळाडूंनी त्यांच्या खेळाप्रती समर्पित होऊन खिलाडूवृत्तीचे दर्शन घडवावे, असे आवाहन स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय मिश्रा यांनी यावेळी केले.
क्रीडा व युवक संचालनालय, जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आजपासून 65 व्या राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेस प्रारंभ झाला. महापौर बाबासाहेब वाकळे, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष अजय मिश्रा, उपमहापौर मालनताई ढोणे, उपवनसंरक्षक आदर्श रेड्डी, त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानचे संस्थापन साहेबराव घाडगे पाटील, महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती लता शेळके, नगरसेविका सुवर्णा गेनप्पा,या स्पर्धेसाठीचे मुख्य रेफ्री नरेंद्र नावर्डेकर, अहमदनगर जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अशोक कोठारी, संदीप जोशी, नमिता फिरोदिया आदींची यावेळी उपस्थिती होती.
यावेळी बोलताना श्री. मिश्रा म्हणाले, देशाच्या प्रत्येक भागातून आलेल्या खेळाडूंनी समर्पित भावनेने खेळून त्यांच्यातील क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवावे. खिलाडूवृत्तीने क्रीडारसिकांची मने जिंकावीत. येथील रसिकांना चांगल्या खेळाचे प्रदर्शन पाहता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
महापौर वाकळे यांनी नगरकरांच्या वतीने सर्व खेळाडूंचे स्वागत केले. नगरकर हे क्रीडारसिक आहेत. तुमच्या क्रीडाकौशल्याला त्यांची निश्चितपणे दाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अहमदनगर शहर व जिल्हा एतिहासिक व पर्यटन स्थळांनी समृद्ध आहे, या स्थळांना या खेळाडूंनी आवर्जून भेट द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
ही स्पर्धा पाच दिवस चालणार असून देशाच्या प्रत्येक भागातील संघ यात सहभागी झाले आहेत. क्रीडारसिकांनी अधिकाधिक संख्येने येऊन या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी केले.
सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मशाल ज्योत प्रज्वलित करुन आणि दीपप्रज्वलन करुन स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. त्यानंतर सहभागी खेळाडूंनी प्रमुख पाहुण्यांना संचलनाद्वारे मानवंदना दिली. कार्यक्रमात सावरा डान्स अॅकेडमीच्या कलावंतांनी सादर केलेले आई अंबे जगदंबे या नृत्यगीताने आणि नृत्यझंकार अॅकेडमीच्या कलाकारांनी सादर केलेल्या राजस्थानी नृत्याने खेळाडू आणि उपस्थितांची मने जिंकली.आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत देशभरातून 26 संघ या स्पर्धेत सहभागी होत असून स्पर्धेच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा संकुलातील क्रीडा सुविधा अद्यावत करण्यात आला असून परिसरही बॅडमिंटनमय झाला आहे. जिल्हा प्रशासन आणि स्थानिक बॅडमिंटन असोसिएशन स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सज्ज झाले आहेत. या राष्ट्रीय बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेसाठी बॅटमिंटन हॉलमध्ये 8 सिंथेटीक कोर्ट तयार करण्यात आले आहेत. या स्पर्धेमुळे शहर आणि जिल्ह्यातील नवोदित खेळाडूंना या राष्ट्रीय खेळाडुंचा खेळ पाहण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यातील क्रीडारसिकांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेला उपस्थिती लावून खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे आणि खेळाचा आनंद घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्री. अशोक गाडे यांनी केले तर आभार जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती नावंदे यांनी मानले.

Tags:
Ahmednagar