नगर (दि.03) प्रतिनिधी -
महानगरपालिकेमध्ये आज विविध विषयावर चर्चा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली यानंतर त्यांनी ठेकेदार व पीएमसीवर नाराजी व्यक्त करत खडे बोल सुनावले आहे. यातुन आता तरी ठेकेदार आणि पीएमसी योग्य रितीने काम करणार का असा प्रश्न आहे.
नगर शहरात सुरू असलेल्या फेज-2, अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा विषय कामे व भुयारी गटर योजनेचे काम अनेक दिवसापासून शहरात सुरू आहे. नगरकराना पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करण्याचा संकल्प मनपाचा आहे. परंतु ठेकेदार व पीएमसीच्या हलगर्जीपणा मुळे कामाला गती मिळत नसल्यामुळे काम संथ गतीने सुरू आहे. वारंवार बैठका घेवूनही ठेकेदार समाधानकारक काम करित नसल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे हे ठेकेदार व पीएमसी वर संतापले त्यांनी त्यांना खडे बोल सुनावले आपआपसात पायात पाय घालण्यापेक्षा एकमेकांच्या सहकार्याने नगरकरांना लवकरात लवकर योजना पूर्ण करून पूर्ण दाबाने पाणी पुरवठा करा अन्यथा दररोज दंड आकारला जाईल अशी ताकीद ठेकेदारांना देण्यात आली. यावेळी फेज-2 पाणी पुरवठा योजनेचे आढावा घेताना 22 जानेवारी पर्यत योजना पूर्ण करण्याचे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी ठेकेदार व पीएमसीला आदेश दिले.
यावेळी उपमहापौर मालनताई ढोणे, नगरसेवक विनीत पाऊलबधे, मनोज कोतकर, मनोज दुलम, रविंद्र बारस्कर,बाळासाहेब पवार,अजय चितळे, संजय ढोणे, यंत्र अभियंता परिमल निकम, अभियंता महादेव काकडे, गणेश गाडळकर, सदाशिव रोहोकले, महेश ओझा, शंकर खोत, निशांत मदने, तापीचे रितेश आग्रवाल, राजू गांगर्डे , राजू गायकवाड, मजीप्रा. उपअभियंता जे.डी.बिवाल, आर.एल.थोरात, एस.एस.बडे, ए.एल.मुळे, पवन भावसार, विकास सुर्वे, मयुर अहिरे, डी.बी.पानसे, आर.एच.पाटील आदी उपस्थित होते.
फेज-2 च्या योजनेतील 200 एमएम डीआय पाईप 2 कि.मी.चे काम लवकरात लवकर संपविण्यात यावे व उर्वरित 8 कि.मी. चे 200 एमएम डीआय पाईप तातडीने मागविणे बाबत कार्यवाही करावी. सदरचे काम 22 जानेवारी 2020 पर्यत पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच खोदकाम केलेल्या जागतील माती तातडीने उचलण्याचे आदेश दिले.
भुयारी गटर योजनेतील पाईप डिझाईन लवकरात लवकर मंजूर करून काम सुरू करण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी पाईप डिझाईन न बदलता मंजूर असलेल्या व्यासाप्रमाणे टाकावयाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश दिले. बुरूडगांव येथील पंपींग स्टेशनचे काम सोमवार पर्यत सुरू करण्याचे आदेश दिले.
पाणी पुरवठा विषयक कामाची माहिती घेताना कामास गती देण्याबाबत आदेश दिले तसेच पाईप लाईन अंथरण्यास अडचणी असलेल्या भागाची तातडीने निवारण करून त्या ठिकाणी देखील पाईप टाकण्यात यावे. दोन तीन दिवसात समक्ष कामाची पाहणी करण्यात येणार असल्याचे मा.महापौर श्री.बाबासाहेब वाकळे यांनी सांगितले.

Tags:
Ahmednagar