नगर (दि.03) प्रतिनिधी -घरामध्ये बसलेले लाईटचे मिटर स्लो करुन देणार्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाचे कंत्राटी मिटर चालक सोमनाथ वाघुले यास चार हजार रुपयांची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.
महिाती अशी की, तक्रारदार महिला हिच्या घराचे लाईटचे बिल नेहमीपेक्षा जास्त आले होते. विद्युत महामंडळाने बसवलेले विद्युत मिटर हे फेरफार करुन मिटर स्लो करुन पुढील महिन्यापासून कमी बिल येण्यासाठी आरोपी सोमनाथ वाघुले याने सदर महिलेकडून 4 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. संबंधीत महिलेने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे या बाबतची तक्रार दाखल केल्यानंतर आज आरोपीला 4 हजार रुपयांची लाच स्विकारताना बालिकाश्रम रोड येथे रंगेहात पकडले.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक हरिष खेडकर यांच्या अधिपत्याखाली पथकाने कारवाई केली आहे.
Tags:
Breaking