नगर शहरात थंडीने थरकाप ः सकाळ उगवली धुक्यांची चादर घेऊन

नगर (दि.04) प्रतिनिधी -
राज्यामध्ये सर्वत्र कडाक्याची थंडी सुरू झाले आहे. नगरचा पारा हा  सात अंशावर येऊन ठेपला आहे. शनिवारी सकाळपासूनच धुक्याची चादर सर्वत्र होती. समोर काय वस्तु आहे हे रस्त्यावर दिसत नव्हते. अवघ्या फुटभर अंतरावरील वस्तु अदृश्य झाल्याचे पाहिला मिळाले. सकाळी दहा वाजता मोठ्या प्रमाणावर थंडी पण सुरू होते
गेल्या दोन-तीन महिन्यांपासून राज्यांमध्ये कडाक्याची थंडी सर्वत्र सुरू झाले आहे. तोच प्रकार नगर शहरामध्ये सुद्धा आता पाहायला मिळत आहे. नगर शहरामध्ये गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट सुरू झाली असल्याने नगरकरांना हुडहुडी भरली आहे. आज सकाळभ नगरला पारा हा सात अंश येऊन ठेपला होता सकाळपासूनच सर्वत्र धुके पडल्यामुळे समोरचे वाहन सुद्धा दिसने कठीण झाले होते. यातुन अनेकांनी शहरातून बाहेर जाण्याचे टाळले आहे.  सकाळी दहा वाजता थंडीचा कडाका हा सुरू होता.

Post a Comment

Previous Post Next Post