24 अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई....

। अहिल्यानगर । दि.03 एप्रिल 2026 । जिल्ह्यात अवैध दारू विक्रीवर आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत विविध ठिकाणी छापे टाकून 24 अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून 1 लाख 36 हजार 842 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी विशेष मोहीम राबविली. त्यानुसार सपोनि हरीष भोये, पोउपनि महादेव गुट्टे तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचार्‍यांची पाच पथके तयार करून जिल्ह्यात अवैध धंद्यांची माहिती काढून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. 

दिनांक 31 मार्च 2026 रोजी या पथकांनी शिर्डी, एमआयडीसी, संगमनेर तालुका, नेवासा, श्रीगोंदा, आश्वी, कोतवाली, श्रीरामपूर शहर, सोनई, राहुरी व तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत छापे टाकले. या कारवाईत 24 ठिकाणी अवैध दारू विक्री होत असल्याचे आढळून आले. संबंधितांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1,36,842 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

शिर्डीमध्ये 5 गुन्हे, एमआयडीसीमध्ये 1 गुन्हा, सोनईत 3 गुन्हे, नेवासामध्ये 3 गुन्हे, संगमनेर तालुक्यात 2, राहुरीत 2, श्रीगोंद्यात 1, आश्वीमध्ये 2, कोतवाली हद्दीत 1, श्रीरमुपर शहरात 4, तोफखाना हद्दीमध्ये 1 असे एकूण 24 गुन्हे दाखल करण्यात आले असून 1 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

 

 

Post a Comment

Previous Post Next Post