पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार, सुनील पवार, रिचर्ड गायकवाड, फुरकान शेख, भगवान थोरात, प्रशांत राठोड, विशाल तनपुरे, सोनल भागवत, उमाकांत गावडे, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
फिर्यादी अमरिशकुमार ओमप्रकाश गुप्ता (वय 57, रा. नारोल लांभारोड, अहमदाबाद, गुजरात) यांच्या कंपनीतील कंटेनरवरील चालक संजय लिलाधर कुमार व क्लिनर लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांनी फिर्यादीच्या कंपनीचे एकुण 555 कापडाचे रोल बेंगलोर येथे घेऊन जाताना आरोपींनी 470 कापडाचे रोल बेंगलोर येथे न पोहचवता ते परस्पर स्वतःच्या आर्थिक फायद्याकरीता वापरले. त्याची एकुण किंमत 78 लाख 82 हजार 184 रुपये इतकी आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की, आरोपींनी नवापूर (जि. नंदुरबार) येथे वाहन उभे करुन त्यातील मुद्देमाल दुसर्या वाहनात भरुन अपहार केला. पथकाने तात्काळ नवापूर येथे जावुन सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच जयपूर, राजस्थानपर्यंत सलग चार दिवस सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. पथकाने राजस्थान येथे जाऊन मोहम्मद युनुस सलाउद्दीन, बाबुलाल जीवनराम जाट, मोहम्मद अमिर सज्जाद यांना ताब्यात घेतले.
त्यांनी पथकाला सांगितले की, संजय लिलाधर कुमार व लिलु मिना उर्फ नंदलाल मिना यांनी अपहार केलेला माल मनोहारठाणा (जि. झालवाड, राजस्थान) येथे लपून ठेवला आहे. त्यानंतर पथकाने 78 लाख 82 हजार 184 रूपये किंमतीचे 470 कापडाचे रोल हस्तगत केले.
