गॅस रिफिलिंग, ऑनलाईन बिंगो जुगार व नेवासातील गावठी अड्ड्यांवर छापे

| अहिल्यानगर | दि.24 जानेवारी 2026 | अहिल्यानगर शहरामध्ये अवैध गॅस रिफिलींग, ऑनलाईन बिंगो जुगार ठिकाणावर व नेवासा येथे अवैध देशी दारु, गावठी दारु अड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करुन 4 गुन्हे दाखल  3 लाख 32 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून 7 आरोपी विरोधात कारवाई केली आहे.

पोलीस अधीक्षक.सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करणेबाबत आदेश दिले आहेत. नमुद आदेशाप्रमाणे पोनि किरणकुमार कबाडी यांनी स्थागुशा व तपास पथकातील पोउपनि अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार अतुल लोटके, सुनिल पवार, गणेश लबडे, गणेश धोत्रे, शाहिद शेख, दिपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, रोहित येमुल, उत्तरेेशर मोराळे अशांचे पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध व्यावसायिकांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन वेगवेगळे पथक रवाना केले.

22 जानेवारी रोजी पथकाने कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ऑनलाईन बिंगो जुगार, तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध गॅस रिफिलींग व नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारु व गावठी हातभट्टीची विक्री करणारे इसमांची माहिती काढुन छापे टाकून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12(अ) प्रमाणे 2 लाख, 63 हजार 300 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून उमेश विठ्ठल राऊत रा. सारसनगर अहिल्यानगर, सोनु संदिप आजबे रा. सदर, विशाल बापु गोसावी रा. केडगांव अहिल्यानगर, आकाश भास्कर गोसावी रा. पिंपळगाव उजैनी ता.जि. अहिल्यानगर यांच्यावर महाराष्ट्र जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे.

तसेच तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125,287,288 कप्रमाणे 44 हजार ,500 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून किरण बबन दंडवते रा. परिचय हॉटेलमागे सावेडी ता.जि. अहिल्यानगर त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे तसेच तिसरी कारवाई नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दारुबंदीकायदा कलम 65 (ई) नुसार 11 हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करून आरोपी विजय अशोक चव्हाण रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर याला अटक केली. दुसरी कारवाई नेवासा पोलीस स्टेशनमध्ये दारुबंदी कायदा कलम 65(ई) 1400 रुपये असा मुद्देमाल जप्त करून आरोपी गणेश सोन्याबापु धेडगे रा. देवगड ता.नेवासा जि. अहिल्यानगर असे एकुण 4 गुन्हे दाखल करून 3 लाख ,32, हजार 240 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून एकूण 7 आरोपीविरुध्द कारवाई करण्यात आली.


Post a Comment

Previous Post Next Post