| मुंबई | दि.23 जानेवारी 2026 | आजपासून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले. पुढच्या वर्षी 100 वर्ष पूर्ण होणार आहेत. यावर्षी जन्मशताब्दी सोहळ्या निमित्त माटुंबगा येथील षण्मुखानंद सभागृहात भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बोलताना महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले की आपण अनेकांनी चढ उतार पाहिले आहेत. राज आणि माझे बालपण एकत्र गेले आहे. आम्ही वादळात खेळत मोठे झालो आहोत. त्यामुळे आम्हाला वादळाशी कसे लढायचे, हे आम्हाला कोणी शिकवण्याची गरज नाही. आज आपल्याशी बोलताना तो सगळा काळ डोळ्यांसामोरून जात असल्याचे उध्दव ठाकरे यांनी सांगितले.
जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजन कार्यक्रमाध्ये उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आजोबा प्रबेधनकार केशव सीताराम ठाकरे, हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह माँ साहेब यांच्या आठवणींना उजाळा दिला.
