राजधानी हादरली... नवी दिल्लीत स्फोट!

राजधानी हादरली... लाल किल्ला परिसरात स्फोट!

। नवदिल्ली । दि.10 नोव्हेंबर 2025 । देशाची राजधानीमध्ये नवी दिल्लीत स्फोट झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात एका कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. ज्या कारमध्ये स्फोट झाला त्यामुळे इतर दोन गाड्यांना देखील आग लागल्याचे माहिती समोर येत आहे.


देशाच्या राजधानीमध्ये झालेल्या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाने घटनास्थळाकडे धाव घेतली. कारमधील स्फोटानंतर आग लागली. हीच आग विझविण्याचा प्रयत्न अग्निशामक दलाकडून केला जात आहे. तर, दुसरीकडे बॉम्ब शोधक पथकही घटनास्थळी दाखल झाले आहे.


स्फोटाची गंभीरता लक्षात घेता दिल्ली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे आणि एनआयएचे पथकही घटनास्थळी पाठवण्यात येत आहे. दिल्लीमध्ये तातडीने ‘हाय अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post