अनुकंपा तत्त्वावरील नोक-यांबाबत मोठा निर्णय

अनुकंपा तत्त्वावरील १० हजार जागा भरणार

| मुंबई  | दि.06 सप्टेंबर 2025 | गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नोक-यांबाबत राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात जवळपास ९,६५८ रिक्त जागा असून, या सर्व जागा येत्या १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत भरण्यात येणार आहेत.

👉 क्लिक करुन वाचा...

विशेष म्हणजे, यावेळी चतुर्थ श्रेणीतील जागाही भरल्या जाणार आहेत. आतापर्यंत या श्रेणीतील बहुतेक पदे खासगी कंत्राटदार मार्फत भरण्यात येत होती. मात्र आता अनुकंपा वरील जागा थेट पात्र वारसांना मिळणार आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि नोकरीच्या माध्यमातून सुरक्षितता मिळेल. ही नियुक्ती प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडणार आहे.

👉 क्लिक करुन वाचा...  

१५ सप्टेंबर २०२५ पासून जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली ही भरती सुरू होईल. यासोबतच सरकारने प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मृत शासकीय कर्मचा-यांच्या कुटुंबियांना अर्जापासून ते नियुक्ती पर्यंतच्या टप्प्यातील अडचणी कमी होणार आहेत.

👉 जिल्हा परिषद शिक्षक पुरस्कारांचे वितरण 

Post a Comment

Previous Post Next Post