मोजका आहार व सदाचार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली : डॉ. सोनाली बांगर

जिल्हा आयुष रुग्णालयात १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस उत्साहात साजरा

मोजका आहार व सदाचार ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली : डॉ. सोनाली बांगर


| अहिल्यानगर  | दि.26 सप्टेंबर 2025 | योग, प्राणायाम, व्यायाम, मोजका आहार व सदाचार हे निरोगी आयुष्याचे गुपित असल्याचे प्रतिपादन जिल्हा आयुष रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. सोनाली बांगर यांनी केले.

जिल्हा आयुष रुग्णालयात १० वा राष्ट्रीय आयुर्वेद दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी डॉ. बांगर बोलत होत्या. कार्यक्रमास स्त्रीरुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉ. भारती पेचे, प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ भूषण देशमुख, बालरोगतज्ज्ञ डॉ. उज्ज्वला शिरसाठ, भूलतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी टायरवाले, डॉ. अर्चना लांडे - देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बांगर म्हणाल्या, रुग्णालय सुरू झाल्यापासून आजपर्यंत ७० हजाराहून अधिक नागरिकांनी उपचारांचा लाभ घेतला आहे. उपचारांमध्ये औषधाइतकेच आहार - विहार व मानसिक सदाचारालाही महत्त्व आहे, असे त्यांनी नमूद केले.

‘लोक व पृथ्वीच्या आरोग्यासाठी आयुर्वेद’ या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. अर्चना लांडे - देशमुख म्हणाल्या की, आयुर्वेद केवळ मनुष्यांसाठीच नव्हे तर सर्व सृष्टीसाठी उपयुक्त आहे. निसर्गपूरक आयुर्वेदीय जीवनशैली माणसाचे आरोग्य जपते व निसर्गाचेही संरक्षण करते.

डॉ. भारती पेचे यांनी सांगितले की, आयुर्वेद ही केवळ उपचारपद्धती नसून एक जीवनशैली आहे. आपल्या सण - उत्सवांमधील आचार - विचारांमध्ये आयुर्वेद रुजलेला आहे.

भूषण देशमुख यांनी जिल्ह्यातील प्राचीन औषधी वनस्पतींबाबत माहिती दिली. आयुष रुग्णालय हे आयुर्वेद सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रभावी माध्यम ठरू शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

डॉ. उज्ज्वला शिरसाठ म्हणाल्या की, लहान मुलांच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. रोजच्या आहारात फास्टफूड टाळून पचनशक्तीनुसार आयुर्वेद सांगितलेला आहार निश्चित केल्यास मुलांचे आरोग्य चांगले राहते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शौनक मिरीकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. नाझिया शेख यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आयुष रुग्णालयाच्या डॉ. जयश्री मस्के, डॉ. इर्शाद मोमीन, डॉ. हरलीनकौर पुरी, डॉ. शोभा धुमाळ, अजिंक्य पवार, अविनाश नाबदे, अजिंक्य भिंगारदिवे, हर्षा फाळके, अनिकेत भडके, एलिझाबेथ तेलधुणे, संगीता नन्नवरे, चैतन्य निकम, अश्विनी बोरगे, योगिता कदम, विशाल केदारी, वर्षा जाधव, पूजा भोसले, अश्विनी निमसे, सागर सुळ, विलास कनकुटे आदींनी परिश्रम घेतले.

अनुकंपा तत्त्वावरील १० हजार जागा भरणार | मुंबई | दि.06 सप्टेंबर 2025 | गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील नोक-यांबाबत राज्य सरकारने अखेर मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरात जवळपास ९,६५८ रिक्त जागा असून, या सर्व जागा येत्या १५ सप्टेंबर २०२५ पर्यंत भरण्यात येणार आहेत. 👉 क्लिक करुन वाचा... विशेष म्हणजे, यावेळी चतुर्थ श्रेणीतील जागाही भरल्या जाणार आहेत. आतापर्यंत या श्रेणीतील बहुतेक पदे खासगी कंत्राटदार मार्फत भरण्यात येत होती. मात्र आता अनुकंपा वरील जागा थेट पात्र वारसांना मिळणार आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि नोकरीच्या माध्यमातून सुरक्षितता मिळेल. ही नियुक्ती प्रक्रिया जिल्हा प्रशासनाच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. 👉 क्लिक करुन वाचा...  

 

Post a Comment

Previous Post Next Post