मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेचे आवेदनपत्रे ऑनलाईन सादर करावेत


। अहिल्यानगर । 19  सप्टेंबर 2025 । शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये विजाभज, इमाव व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलवर दि. ३१ ऑगस्ट २०२५ पासून सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व महाविद्यालयांनी पात्र विद्यार्थ्यांची आवेदनपत्रे विहित वेळेत भरून घेण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक विनोद लोंढे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील महाविद्यालयांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे भारत सरर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, विद्यावेतन व राजर्षी शाहू गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेंतर्गत महाडीबीटी प्रणालीवर नवीन व जुनी आवेदनपत्रे तातडीने भरून घेण्यासाठी समान संधी केंद्राद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. आवेदनपत्रे मुदतीत सादर न झाल्यास व विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी महाविद्यालयातील प्राचार्यांची असेल, असेही कळविण्यात आले आहे.

 


Post a Comment

Previous Post Next Post