अभियांत्रिकी कॉलेज चोरट्यांनी फोडले...

। अहिल्यानगर । 12 सप्टेंबर 2025 ।  नगर कल्याण महामार्गावर नेप्ती (ता.नगर) शिवारात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अभियांत्रिकी कॉलेजच्या विविध विभागांच्या दरवाजांची कुलुपे तोडून मोठ्या प्रमाणावर उचकापाचक करत लेखा विभागातील कपाटातून २ लाख ४२ हजार १३० रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. कॉलेजच्या सीसीटीव्ही मध्ये २ चोरटे कैद झाले असून पोलिसांनी या चोरट्यांचा तपास सुरु केला आहे.

👉 क्लिक करुन वाचा...

याबाबत कॉलेजचे डॉ. यशवंत रामचंद्र खर्डे (वय ५५, रा. कोल्हार, ता.राहाता) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात ११ सप्टेंबर रोजी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार २ अनोळखी चोरट्यांनी ७ सप्टेंबर रोजी ९.३० च्या सुमारास कॉलेजचे मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर कॉलेजच्या विविध विभागांचे दरवाजे तोडून नुकसान केले. सर्वत्र उचकापाचक केली. कॉलेज मधील लेखा विभागात विद्यार्थ्यांच्या फी चे जमा झालेले २ लाख ४२ हजार १३० रुपये कपाटात ठेवण्यात आलेले होते.

👉 क्लिक करुन वाचा...

त्या कपाटाचे कुलूप तोडत चोरट्यांनी ही रक्कम घेवून पोबारा केला. ही घटना दुसऱ्या दिवशी उघडकीस आल्यावर कॉलेजच्या व्यवस्थापनाने सर्व विभागांची चौकशी करत कोणत्या विभागातून काय चोरीला गेले याचा आढावा घेतला. त्याचा अहवाल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्था प्रशासनाला दिला. त्यानंतर प्रशासनाच्या सूचनेनुसार नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.

👉 क्लिक करुन वाचा...  

Post a Comment

Previous Post Next Post