दक्षिणेतील कामाची चौकशी उत्तरेच्या दारात अद्याप अपुर्णच!

दक्षिणेतील कामाची चौकशी उत्तरेच्या दारात अद्याप अपुर्णच!

चौकशीला लागले कुणाचे ग्रहण?

। अहिल्यानगर । दि.5 जुन 2025 । जिल्हा परिषद नविन इमारतीमधील स्वच्छता गृहाची दुरुस्तीचे काम अपुर्ण आणि न केलेल्या कामाचे बिल परस्पर संगनमताने काढल्याचा आरोप करत रिपब्ल्किन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे रोहित आव्हाड यांनी चौकशी करुन गुन्हे दाखल करण्याची मागणी केली होती. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

मात्र, 22 मे रोजी दिलेल्या निवेदनाची कोणतीच दखल अद्यापपर्यंत घेतली गेले नसल्याचे चित्र दिसुन येत नाही. चौकशी अधिकार्‍यांनी कामांची कागदपत्रे मागीतली असून अद्यापही ती कागदपत्रे देण्यात आली की नाही याचा कोणालाच ठाव ठिकाणा नाही. चौकशी समितीला कागदपत्रे देण्यास नेमके कोण टाळाटाळ करतय? असा प्रश्न असुन दक्षिणतील कामांची चौकशी उत्तरेच्या दारात गेल्या पंधरा दिवसांपसून अपुर्णच असल्याने विविध चर्चेला जिल्हा परिषद वर्तुळात उत आला आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

अहिल्यानगर जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम दक्षिण विभागात स्वच्छतागृहाची दुरुस्ती कामे न करता बिल काढणार्‍या संबंधित अकिधकार्‍यांची चौकशी करुन निलंबित करण्यात यावे या तक्रारीची दखल अद्यापही घेतली  जात नसल्याने उत्तर विभागातील अधिकार्‍यांना ठेकेदार दाद देत नसल्याची चर्चा जोर धरु लागली आहे. तसेच अशा प्रकारात नेमके कोण कोणाला पाठीशी घालतय असा देखील प्रश्न निर्माण होत चालला आहे. या कामांची चौकशी होवून तक्रारदाला न्याय मिळणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post