। नवी दिल्ली । दि.28 मे 2025 । राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्या पुरस्कार विजेत्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
राष्ट्रपती भवनात मंगळवारी झालेल्या शानदार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘पद्मश्री पुरस्कारां’चे वितरण करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना (1 पद्मभूषण आणि 5 पद्मश्री) त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. यंदाच्या पद्म पुरस्कार वितरणाची प्रक्रिया दोन टप्प्यात झाली. पहिल्या टप्प्यात 71 जणांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले तर दुसर्या टप्प्यात 68 पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले.
Tags:
Breaking