महापालिकेचे कामगार आंदोलनावर ठाम!

 

। अहिल्यानगर । दि.26 मे 2024 । महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत मनपा कामगार युनियनने प्रशासनाला २८ मे रोजी महापालिकेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या पार्श्वभूमीवर मनपा प्रशासनाने युनियनच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता किंवा बैठकीचे आयोजन न करता कोणतेही ठोस आश्वासन नसलेले लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे युनियनने आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका घेतली आहे.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

आंदोलनाच्या नियोजनासाठी युनियन पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी युनियनचे अध्यक्ष जितेंद्र सारसर व बाबासाहेब मुदगल, सचिव आनंद वायकर, अनंत लोखंडे, राहुल साबळे, आदी उपस्थित होते. महापालिकेला युनियनने आंदोलनाची पूर्वसूचना देणारी नोटीस दिली होती. त्यावर जे प्रश्न प्रलंबित आहेत, त्याची सद्यस्थिती मांडून प्रशासनाने थातूरमातून लेखी उत्तर कळवले आहे. 

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

प्रलंबित रकमा कधी वर्ग करणार, शासनाकडे प्रस्ताव किती दिवसात पाठवणार याची कोणतीही ठोस माहिती दिली नाही. काही प्रश्नांबाबत संबंधित विभागाचा विषय असल्याचे सांगत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. मुळात या प्रश्नांबाबत अधिकारी व युनियन पदाधिकाऱ्यांची बैठक होऊन चर्चा होऊन मार्ग निघणे, ठोस आश्वासन मिळणे अपेक्षित होते.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

त्याशिवाय प्रश्न किती दिवसात मार्गी लागेल, हे कळणार नाही. सदरचे पत्र युनियनला मान्य नसल्याचे सांगत २८ मे रोजी होणाऱ्या आंदोलनावर आम्ही ठाम असल्याचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल व जितेंद्र सारसर यांनी स्पष्ट केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post