कोतवाली पोलिसांची पुणे बसस्थानकाजवळ कारवाई

कोतवाली पोलिसांची पुणे बसस्थानकाजवळ कारवाई

तलवार घेऊन दहशत करणार्‍यास युवकास पकडले

| अहिल्यानगर | | दि.22 मार्च २०२५ |धारदार तलवार बाळगणार्‍या युवकास कोतवाली पोलिसांनी पकडले. सचिन चंद्रकांत काळे (वय 24, रा. सदाफुले वस्ती, ता. जामखेड) असे त्याचे नाव आहे. ही कारवाई नगरमधील पुणे बसस्थानकाच्या बाजुच्या काटवनामध्ये करण्यात आली. 

पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगीता कोकाटे, उपनिरीक्षक देशमुख, पोहेकॉ विशाल दळवी, संदीप पितळे, दशरथ थोरात, दीपक रोहोकले, तानाजी पवार, सूरज कदम, अतुल कोतकर, शिरिष तरटे, सचिन लोळगे, संकेत धीवर, सोमनाथ राऊत, राम हंडाळ यांच्या पथकाने केली.

तलवार घेऊन काही तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने एक युवक लोकांमध्ये दहशत करत फिरत आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेवरून गुन्हे शोध पथकाने सदर ठिकाणी कारवाई करीत काळे यास ताब्यात घेतले.

 त्याच्याकडे 4 हजार रूपये किंमतीची तलवार आढळून आली. पोकॉ सचिन लोळगे यांच्या फिर्यादीवरून सचिन काळे याच्याविरूध्द शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप पितळे करीत आहेत.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post