चेन स्नॅचिंग करणारा चोरटा दुचाकीसह जेरबंद


। अहिल्यानगर । दि.01 मार्च 2025 । शहरात महाशिवरात्रीच्या दिवशी व त्या अगोदर फेबु्रवारी महिन्यात झालेल्या चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील आरोपी कोतवाली पोलिसांनी जेरबंद केला. अभिमन्यू विलास कुसळकर (वय 23, रा. बालाजीनगर, सोनई, ता. नेवासा) असे त्याचे नाव आहे. या कारवाईत कोतवाली पोलिसांनी एक दुचाकी आणि 1 लाख 74 हजार रूपयांचे सोन्याचे दागिने असा एकूण 2 लाख 24 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगिता कोकाटे, विशाल दळवी, संदीप पितळे, तानाजी पवार, सूरज कदम, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, शिरिष तरटे, संकेत धीवर, राम हंडाळ यांनी ही कारवाई केली. कोतवालीचे गुन्हे शोध पथक आरोपीचा शोध घेत असताना, पथकाला अभिमन्यू कुसळकर दुचाकीसह ( एमएच 17 सीयू 4008) मिळून आला.

 त्याने दोन गुन्हयांची कबुली दिली. दोन्ही गुन्ह्यात चोरी केलेला 1 लाख 74 हजार रूपये किंमतीचा सोन्याचा मुद्देमाल पथकाने जप्त केला आहे. सदरचे गुन्हे त्याने साथीदार अजय रूस्तम शिंदे (रा. कोठला) याच्यासह केल्याची कबुली दिली. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post