महाकुंभमेळ्यात गेलेल्या भाविकांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष
। अहिल्यानगर । दि.02 फेब्रुवारी 2025 । उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यात गेलेल्या भाविकांच्या मदतीसाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे.
महाकुंभमेळ्यासाठी गेलेले भाविक त्याठिकाणी अडकून पडल्यास किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरावर संबंधीत तहसिलदार यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.
भाविकांनी मदतीसाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी ०२४१-२३२३८४४, २३५६९४० या दूरध्वनी क्रमांकावर किंवा १०७७ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Tags:
Ahmednagar