अहमदनगर पोस्टल डिव्हीजन सोसायटीला राज्यस्तरीय बॅको पतसंस्था पुरस्कार प्रदान


। अहिल्यानगर । दि.02 फेब्रुवारी 2025 ।  कोल्हापूर येथील अविज पब्लीकेशन वतीने  देण्यात येणारा बँको पगारदार पतसंस्था पुरस्कार यावर्षी अहमदनगर पोस्टल डिव्हीजन को ऑप क्रेडीट सोसायटीला प्रदान करण्यात आला.  

दरवर्षी राज्यातील विविध सहकारी संस्थांना उल्लेखनीय कार्याद्दल हा पुरस्कार दिला जातो. यावर्षीचा पुरस्कार सोहळा नुकताच लोणावळा येथील अ‍ॅम्बेव्हॅली येथे आयोजित करण्यात आला होता. हा पुरस्कार माजी सहकार आयुक्त चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते संस्थेचे चेअमरमन रामेश्वर ढाकणे, संचालक निसार शेख, सलीम शेख व व्यवस्थापक नितीन वाघ यांनी स्विकारला.

यावेळी बैंकों मासिकाचे संपादक अविनाश गुंडाळे सह विविध संस्थाचे पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पुरस्काराकरीता संस्थेची आर्थिक स्थिती,सामाजिक कार्य, ऑडिट वर्ग, सभासदांच्या ठेवी व कर्ज, थकबाकीचे प्रमाण यासह 20 निकषावर खरे उतरत संस्थेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

स्वातंत्र्य पूर्व काळात स्थापन झालेल्या या संस्थेने यावर्षी 105 व्यावर्षात पर्दापन केलेले असून संस्थेस पगारदार पतसंस्था विभागातील राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त करण्यासाठी सेक्रेटरी प्रफुल्लकुमार काळे,  संचालक प्रमोद कदम, अमीत कोरडे, महेश तामटे, किशोर नेमाने, बळी जायभाय, सुनील कुलकर्णी, शिवाजी कांबळे, संचालिका अर्चना दहिंडे, स्वप्ना चिलवर आदीनी प्रयत्न केले.

संस्थेच्या या यशाबद्दल सभासद सुनील भागवत, देवेंद्र शिंदे, दिलीप खरात, बलराम दाते, आनंद भोंडवे, दिपक जसवाणी,  सतिष येवले, शरद नवसुपे, महेश क्षिरसागर, सुभाष चव्हाण, नवनाथ शिंदे, दिगंबर शिंदे, दिपक भुसारे, रमजान पठाण, प्रदिप बनकर, सुखदेव पालवे, संदीप मिसाळ, सचिन अस्वर, विजय कोल्हे, गणेश केसकर, सचिन देवकाते, अमोल बोरुडे, जय मडावी, गणेश कोल्हे, अरविंद वालझाडे, अविनाश आढाव, धनंजय दैठणकर, कैलास भुजबळ, वेदशास्त्री वाकळे, राजु कोल्हे, अंबादास सुद्रीक, जावेद शेख, आदीनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post