अंतराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा नगर मध्येच उपलब्ध होणार : सिद्धाराम सालिमठ

अंतराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा नगर मध्येच उपलब्ध होणार : सिद्धाराम सालिमठ

साईदीप-सह्याद्री हॉस्पिटलच्या विस्तारीत आरोग्य प्रकल्पाची घोषणा


। अहिल्यानगर । दि.02 फेब्रुवारी 2025 । साईदीप व सहयाद्री हॉस्पिटलच्या संयुक्त माध्यमाने  साकार होणाऱ्या वैद्यकीय विस्तार प्रकल्पामुळे  नगरमध्ये अंतराष्ट्रीय दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होतील तसेच सामान्य लोकांना कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांवरही उपचारासाठी इतर ठिकाणी जाण्याची गरज शक्यतो पडणार नाही,  असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालिमठ यांनी केले.

साईदीप व सहयाद्री हॉस्पिटलच्या संयुक्त माध्यम प्रकल्पची  घोषणा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.  कार्यक्रमाला सौ. मीनाक्षी सालिमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष येरेकर, जिल्हा पोलीस प्रमुख राकेशकुमार ओला, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एम. चव्हाण, ओंटेरिओ टीर्चर्स पेन्शन प्लॅन (ओ टी पी पी) चे भारतातील प्रमुख राहुल मुकीम, 

कौस्तुभ मणियार सहयाद्री हॉस्पिटलचे  संचालक डॉ सुनील राव, डॉ खातू मार्केटिंग हेड  मनोज राय, साईदीप हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. दीपक एस‌. एस., सौ. ज्योती दीपक, संचालक डॉ. आर. आर. धूत,  डॉ.शामसुंदर केकडे,डॉ. डॉ. रवींद्र सोमाणी,  डॉ. निसार शेख,डॉ. इक्बाल शेख, डॉ. हरमीत कथुरिया, डॉ. अनिल कुऱ्हाडे, डॉ. किरण दीपक, डॉ.राहुल धूत,डॉ. वैशाली किरण मंचावर उपस्थित होते. डॉ कैलास झालानी आणि डॉ व्ही एन देशपांडे यांनी उपस्थित मान्यवारांचे स्वागत करून परिचय करून दिला.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी सालिमठ यांनी सांगितले की,  सध्याचे साईदीप हॉस्पिटल परिपूर्ण आहे. आता सहयाद्री सोबत जॉईंट व्हेन्चर  झाल्याने अद्यावत कॅन्सर रेडियेशन युनिट, अवयव प्रत्यरोपण तसेच कृत्रिम बुद्धिमत्ताच्या साहाय्याने रोबोटिक शस्त्रक्रिया होतील आणि बेड संख्याही वाढणार आहे. या नवीन प्रकल्प अंतर्गत विविध विभाग सुरु होणार असल्याने स्थनिकांना रोजगार सुद्धा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. 

डॉ. दीपक यांची दूरदृष्टी व  त्यांच्या सहकारी डॉक्टर्सची साथ यामुळे दोन्ही हॉस्पिटल्सचे एकत्रिकारण होऊन अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत व त्याचा सामान्यांना लाभ मिळेल. पोलीस अधीक्षक राकेशकुमार ओला यांनी दोन्ही हॉस्पिटल्सचे एकत्रिकीरणामुळे अद्ययावत आरोग्य सुविधा उपलब्ध होऊन रुग्णांना त्याचा लाभ होईल.

यावेळी बोलताना ओ टी पी पी चे राहुल मुकीम यांनी एकत्रिकारणामुळे साईदीप सहयाद्री हॉस्पिटल मध्ये आम्ही प्रारंभी सुमारे  172 ते 200 कोटीची गुंतवणूक केली आहे.  चेअरमन डॉ दीपक यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल होणार असून हॉस्पिटल चे दर्जा, मूल्यांकन आणि मानाकन वाढणार आहे. आणि उत्कृष्ठ आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना चेअरमन डॉ. दीपक यांनी साईदीप सहयाद्री हॉस्पिटल मध्ये परदेशी  गुंतवणूक झाल्याने प्रथमच अहिल्यानगर हे जागतिक पातळीवर पोहोचले आहे आणि साईदीप हॉस्पिटल चे वैद्यकीय क्षेत्रात महत्व वाढल्याने तसेच अद्ययावत आरोग्य सुविधा प्रदान करण्यासाठी व्यवसायिक भागीदार म्हणून सहयाद्री हॉस्पिटल सोबत आम्ही करार करून कॅन्सर रेडियेशन युनिट, अवयोव प्रत्यरोपण ज्यामध्ये लिव्हर, किडनी ट्रान्सप्लांट आता नगर मध्ये शक्य होणार आहे.  AI चा वापर करून अचूक निदान व उपचार पद्धती उपलब्ध करण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करताना जेष्ठ संचालक डॉ.आर. आर. धूत म्हणाले , साईदीप हॉस्पिटल आम्ही विकले आणि सर्व डॉक्टर्स इथून जाणार आहे अश्या अनेक अफ़वा पसरवल्या जात होत्या‌. पण आम्ही दोन्ही हॉस्पिटल्सचे एकत्रिकीकरण केले आहे आणि नगरच्या दरात अद्ययावत व आधुनिक उपचार पद्धती उपलब्ध होणार आहेत.  कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. संगीता कुलकर्णी आणि डॉ. पायल धूत यांनी केले.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  

Post a Comment

Previous Post Next Post