। अहिल्यानगर । दि.01 फेब्रुवारी 2025 । शेंडी बायपास येथील सिनारे ऍटोमोटर्स शोरूमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरून करून रोख रक्कम व मोबाईल असा एकूण 9 हजार 157 रूपयांचा ऐवज लंपास केला.
ही घटना दि. 29 जानेवारी रोजी रात्री आठ ते दि. 30 जानेवारी रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान घडली. या घटनेबाबत आकाश अशोक भोत (वय 32, रा. आरोह कॉलनी, सावेडी) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. 29 रोजी रात्री आठ ते दि. 30 रोजी सकाळी साडेनऊच्या दरम्यान शोरूम बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने शोरूममध्ये प्रवेश करून शोरूममधील 6 हजार 657 रूपयांची रोख रक्कम आणि 2 हजार 500 रूपयांचा मोबाईल, असा एकूण 9 हजार 157 रूपयांचा ऐवज चोरून नेला. एमआयडीसी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून पुढील तपास सफौ शेख हे करीत आहेत.