सोलापूरकरांनी गाजवला महाराष्ट्र केसरीचा आखाडा

महेंद्र गायकवाड, वेताळ शेळके, विशाल बनकर, पृथ्वीराज मोहळ, सुदर्शन कोतकर, चेतन रेपाळे उपांत्यपूर्व फेरीत दाखल


। अहिल्यानगर । दि.01 फेब्रुवारी 2025 । महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नेहमीच वर्चस्व गावणार्‍या कोल्हापूरचे अस्तित्व या वर्षी जवळपास संपुष्टात आले आहे. गादी व माती विभागात कोल्हापूर दोन मल्ल पात्रता फेरीतच गारद झाले होते. तर तिघेजन पहिल्या फेरीतून बाहेर पडले दुसर्‍या फेरीत एक जण गादर झाला. आता एक मलची लढत बाकी आहे. दरम्यान, महाराष्ट्र केसरी गटात पहिला दिवस सोलापुरकरांनी गाजविला आहे.

माती विभागात सोापूरच्या महेंद्र गायकवाड वेताळ शेळके, विशाल बनगर, सागर खरात या मल्लांनी सलग दोन राऊंड जिंकून उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर गादी विभागात पृथ्वीराज मोहोळ यांनी आक्रमक खेळ पुणेकरांची स्वप्न जिवंत ठेवले आहे.

ज्ञानेश्वर (माऊली) जमदाडे, याला शेख, हर्षवर्धन सदगीर या दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे. या लढती पाहण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यभरातून कुस्ती शौकीन वाडिया पार्कमध्ये दाखल झाले आहे. तिसर्‍या दिवशीच्या सकाळी व सायंकाळच्या सत्रात माती व गादी विभागातील 57, 86,ख 31, 79 आणि 86 व महाराष्ट्र केसरी (125) किलो वजनी गटातील लढती झाल्या.

उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेले मल्ल
गादी विभाग : सतपाल शिंदे (मुंबई), सतिष मुढे (गोदिया), धनाजी कोळी (नंदुरबार), पृथ्वीराज मोहोळ (पुणे), चेतन रेपाळे (अहिल्यानगर), सागर खरात (सांलापूर), शिवराज राक्षे (नांदेड), सुदर्शन कोतकर (अहिल्यानगर)

माती विभाग  : महेंद्र गायकवाड (सोलापूर), संदीप मोटे (सांगली), वेताळ शेळके (सोलापूर), विशाल बनकर (सोलापूर), साकेत यादव (परभणी), विक्रमसिंह भोसले (भंडारा), आकाश रानवडे (पुणे), सुहास गोडगे (गोंदिया)

माती विभागातील ७९ किलो वजनी गटातील उपांत्य फेरीत अहिल्यानगरच्या ऋषिकेश शेळके याने जालन्याच्या प्रमोद काळेचा १२-१, तर साताऱ्याच्या संदेश शिपकुले याने धक्कादायक निकालाची नोंद करत सांगलीच्या नाथा पवारचा ११-० अशा गुण फरकाने एकतर्फी पराभव करत अनपेक्षितपणे अंतिम फेरीत प्रवेश केला. ऋषिकेश शेळके आणि संदेश शिपकुले यांच्या झालेल्या अंतिम लढतीत संदेशने ऋषिकेशचा १२-२ अशा गुणाधिक्यांनी पराभव करत सुवर्णपदक पटकावले तर ऋषिकेशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदकासाठी प्रमोद काळे आणि नाथा पवार यांच्या झालेल्या लढतीत नाथा पवारने प्रमोद काळेचा ११-० अशा गुण फरकाने पराभव करत कांस्यपदक जिंकले.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग  



 

Post a Comment

Previous Post Next Post