अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 'माहेश्वरी’चा मदतीचा हात

अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना 'माहेश्वरी’चा मदतीचा हात

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप । ट्रेकॅम्पच्या विशाल लाहोटींचा पुढाकार

 

। अहिल्यानगर । दि.22 जानेवारी 2025 । अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी अहिल्यानगरमधील श्री माहेश्वरी युवा संगठनने पेठेची वाडी (ठाकरवाडी, ता. अकोले) येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य पुरविले. हे साहित्य ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी व मेघा लाहोटी यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. या वेळी मुलांच्या चेहर्‍यावर आनंद ओसंडून वाहत होता.

पेठेची वाडी हे महाराष्ट्रातील अति दुर्गम गाव आहे. हे गाव ठाकरवाडी या नावाने सुद्धा ओळखले जाते. येथे आदिवासी ठाकर समाज राहतो. शिक्षणाप्रती या ठिकाणी अजूनही उदासीनता दिसून येते. त्यामुळे शाळेमध्ये मुलांना पाठविण्याचे प्रमाण कमी आहे. विरळ लोकवस्तीचा हा दुर्गम भाग आधुनिक जगाशी अनभिज्ञ आहे. 

या गावांमध्ये शाळेत फक्त 25 विद्यार्थी आहेत, पहिली ते चौथी एकाच वर्गात ही शाळा भरते. एकच शिक्षक आणि तोच मुख्याध्यापक. मुलांना शाळेमध्ये जाण्यासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून शालेय वस्तूंचे वाटप करावे, अशी विनंती सरपंच भास्कर बादड यांनी ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी यांच्याकडे केली होती. 

हा विचार नगरमधील माहेश्वरी युवा संघटन कार्यकारिणीला सांगितला. त्यास संघठनचे शाम भुतडा, अनिकेत बलदावा, अमित झंवर, दीपक जाजू, पीयूष झंवर, प्रणव बिहानी, गोविंद दरक, लड्डा परिवार, पुरूषोत्तम सोमानी, गोविंदा जाखोटिया यांनी लगेचच या प्रस्तावास मान्यता देऊन तत्परतेने स्कूल बॅग, वह्या, पेन, कंपास, चित्रकलेचे साहित्य, पॅड असा शालेय साहित्याचा संच बनवून लाहोटी यांच्याकडे दिला.

त्यांनी नुकतीच प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन हे साहित्य वितरित केले. या वेळी पाचनईचे सरपंच भास्कर बादड, शालेय समितीच्या अनिता सावळे, ट्रेकॅम्पचे संस्थापक विशाल लाहोटी व मेघा लाहोटी आदी उपस्थित होते.

👉 क्लिक करुन वाचा साप्ता.विजयमार्ग

    देश समृद्ध करावयाचा असल्यास देशातील तळागाळातील प्रत्येकाचा शैक्षणिक विकास होणे गरजेचे आहे. दुर्गम भागातील, वंचित विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माहेश्वरी युवा संगठनप्रमाणेच इतर सामाजिक संस्था व व्यक्तींनी मदतीचा हात द्यावा. अशा कृतींमधून मुलांचे भविष्य घडेल आणि देशाचेही.
    - विशाल लाहोटी, संस्थापक, ट्रेकॅम्प, अहिल्यानगर

Post a Comment

Previous Post Next Post