महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळणार नगरचे दोन संघ

आ. जगताप यांच्या पाठपुराव्याला यश; कुस्तीगीर संघाची मान्यता

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत खेळणार नगरचे दोन संघ 

। अहिल्यानगर । दि.21 जानेवारी 2025 । महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आयोजकांच्या निमंत्रित संघाचा सहभागा व्हावा, यासाठी अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाचे जिल्हाध्यक्ष आ.संग्राम जगताप यांनी राज्य संघटनेकडे मागणी किली होती. 

त्यानुसार राज्य कुस्तीगीर संघाने महत्त्वाचा निर्णय घेत नगरमध्ये होणार्‍या 67 व्या वरिष्ठ राज्य अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाकरिता स्पर्धा आयोजक म्हणून 

मुख्य संघाव्यतिरिक्त स्वतंत्र निमंत्रित संघ स्पर्धेत खेळवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या मान्यतेचे पत्रही राज्य सचिव पै.योगेश दोडके यांनी जिल्हा कुस्तीगीर संघाला दिले आहे. त्यामुळे जिल्ह्याचे दोन संघ महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवडण्यात येणार आहेत.

 67 वी वरिष्ठ राज्य अजिंक्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे यजमानपद नगर जिल्ह्यास मिळाले आहे. येत्या 29 जानेवारी पासून सुरु होणार्‍या या स्पर्धेची तयारी करण्यात येत आहे. यासाठी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत आयोजकांचा स्वतंत्र निमंत्रित संघास खेळण्यास राज्य कुस्तीगीर संघाने परवानगी द्यावी, अशी मागणी

आ. जगताप यांनी राज्य संघटनेकडे करून वारंवार पाठपुरावा केला होता. आ. जगताप यांच्या या पाठपुराव्यास यश आले असून महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आता जिल्ह्याचा संघ आयोजक म्हणून मुख्य संघाव्यतिरिक्त स्वतंत्र निमंत्रित संघ स्पर्धेत खेळवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post