मालमत्ता कर न भरल्यास कारवाई : उपायुक्त शिंदे
सिध्दीबाग शॉपिंग कॉम्प्लेक्समधील गाळेधारकांनी भरले साडेअकरा लाख
। अहिल्यानगर । दि.22 जानेवारी 2025 । महापालिकेच्या वतीने कर वसुलीसाठी जोरदार मोहीम हाती घेतले असून आयुक्त यशवंत डांगे यांनी 31 जानेवारीपर्यंत 100 टक्के शास्ती माफी जाहीर केली आह त्या पार्श्वभूमीवर उपायुक्त वैशाली शिंदे यांनी महापालिकेच्या मार्केट विभागाच्या वतीने सिद्धीबाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील 1 ते 26 गाळेधारकांना भाडे भरण्याचे सांगितले,
त्यानुसार सर्व गाळेधारकांकडून 11 लाख 50 हजारचा वसुली करत उर्वरित भाडे 31 मार्चपर्यंत भरण्याचे आदेश दिले. तरी नगरकरांनी शास्ती माफीचा लाभ घेऊन आपला कर भरावा व महापालिकेला सहकार्य करावे, अन्यथा कर न भरणार्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा उपायुक्त वैशाली शिंदे यांनी दिला.
सिद्धिबाग शॉपिंग कॉम्प्लेक्सचे गाळे भाडे मार्केट विभागाच्या वतीने गाळेधारकांकडून 11 लाख 50 हजार रुपयाचा धनादेश उपायुक्त वैशाली शिंदे यांच्याकडे सुपूर्त केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, मार्केट विभागप्रमुख सतीश पुंड, तुळशीराम जगधने, राम चाफे, बापू बेलेकर, आसाराम गुंड, शिवराम गवांदे, गाळेधारक उपस्थित होते.