। मुंबई । डिसेंबर । दि.02 डिसेंबर 2024 । राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला होता. यानंतर आता पुढील पाच वर्षे राज्यात आणि केंद्रात महायुती आणि एनडीएची सत्ता असणार आहे.
या पोर्शभूमीवर आता महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे आकाराला येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.कारण, सागर बंगल्यावर सोमवारी दुपारी शरद पवार गटाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी हजर झाले.
सुरेश म्हात्रे भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. मे महिन्यात झालेल्या निवडणुकीत सुरेश म्हात्रे हे कपिल पाटील यांचा पराभव करत जायंट किलर ठरले होते. मात्र, आता विधानसभेच्या निकालानंतर सुरेश म्हात्रे अचानक देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर पोहोचल्याने राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.
Tags:
Politics
