म्हसले शिवारातून 250 फूट केबलची चोरी

। अहमदनगर । दि.16 सप्टेंबर । तालुक्यातील म्हसले गावच्या शिवारातून बापुसाहेब भानुदास घोलप या शेतकर्‍याची अंदाजे 3 हजार रुपये किमतीची 250 फूट केबलची अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना दि.13 रोजी घडली.

याबाबत शेतकरी बापुसाहेब भानुदास घोलप (वय 43 वर्षे) धंदा-शेती रा.म्हसले शिवार, ता.नेवासा यांनी नेवासा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, म्हसले शिवार गट नं.64/1 मधून कोणीतरी अज्ञात चोरटयाने अंदाजे 3 हजार रुपये किंमतीची टेक्स्मो कंपनीची काळे रंगाची केबल आतमध्ये ऍ़ल्युमिनीयम तार असलेली 250 केबल फूट केबल कापुन चोरुन नेली आहे.

या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात भादविक. 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटना स्थळी भेट दिली. पोना के.आर. काळे हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post