गोंदियामध्ये शिवशाहीला अपघात....


मुंबई । दि.29 नोव्हेंबर 2024 । गोंदिया जिल्ह्यातील अर्जनी तालुक्यातील खजरी गावाजवळ शिवशाही बसला भीषण अपघात झाला असल्याची माहिती समोर येत आहे. सदर बसचा अपघात इतका भिषण होता की, यामध्ये 30 ते 35 प्रवाशी जमखी झाले आहे. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासन दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ आज दुपारी 1 च्या सुमारास नागपुरहून गोंदियाकडे येत असलेली शिवशाही बस उलटली. यामध्ये आठ प्रवाशांचा मृत्यू देखील झाला असल्याची माहिती मिळत आहे. तर जमखीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर अपघाताबाबत स्थानिक प्रशासनाकडून परिस्थितीची माहिती घेतली. तसेच जखमींना तातडीने आणि योग्य उपचार देण्याच्या सूचना देखील एकनाथ शिंदेंनी दिल्या. त्याचप्रमाणे अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश देखील एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

👉सा.विजयमार्ग वाचा...एका क्लीकवर  

 


Post a Comment

Previous Post Next Post