डॉ.सुजय विखे पाटील उतरणार आता विधानसभेच्या मैदानात
डॉ.सुजय विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना शिर्डी विधानसभा मतदार संघात सुरु असलेल्या दौ-यांबाबत काही गोष्टी स्पष्ट केल्या. या मतदार संघातून ना.राधाकृष्ण विखे पाटील हेच निवडणूक लढविणार असून, आमच्या कुटूंबाच्या दृष्टीने सुध्दा सर्वपरी तेच आहेत. त्यामुळे मी शिर्डी मधून निवडणूक लढवेल ही चर्चा निष्फळ आहे. लोकतांत्रिक प्रक्रीयेत सर्वांनाच उमेदवारी मागण्याचा आधिकार आहे. भारतीय जनता पक्षाचे वैशिष्ट हेच आहे. पक्षाकडे सामान्य कार्यकर्ता उमेदवारी मागू शकतो. नगर दक्षिणमध्ये आ.राम शिंदे यांच्यासह अनेकजण इच्छुक होते. त्याच पध्दतीने विधानसभेला कोणी उमेदवारी बाबत इच्छा व्यक्त केली असेल तर, यात गैर काही नाही अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.
👉 राज्यातील मोटार निर्मिती उद्योगात क्रांती आणणारा...
विधानसभा निवडणूक लढविण्याच्या प्रश्नावर बोलताना डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की, उत्तर भागामध्ये श्रीरामपूर मतदार संघ हा राखीव आहे. कोपरगावचे राजकाराण खुप क्लिष्ट आहे. त्यामुळे राहुरी आणि संगमनेर हेच पर्याय माझ्यासमोर आहेत. कारण याही तालुक्यात अनेकजण इच्छुक आहेत. त्यांच्यात एकमत झाले नाही आणि माझ्या नावावर एकमत होत असेल तर आपण तयार आहोत. माझे काम फक्त अर्ज करण्याचे आहे. पक्षाने आदेश दिला तर, त्यानुसार आपण पुढे निर्णय करणार असल्याचे सुचक वक्तव्य यांनी केले.
