समृद्धी महामार्गाला वर्षभरातच पडल्या भेगा


। मुंबई । दि.12 जुलै 2024 । भाजप सरकारचा महत्वाकांक्षी नागपूर-मुंबई महामार्गावरील समृद्धी महामार्गावर वर्षभरातच भेगा पडल्याचे समोर आले आहे. या रस्त्यावर सुरूवातीला होणार्‍या अपघातामुळे समृद्धी महामार्ग चर्चेत आला असतांनाच आता या रस्त्यावर भेगा पडल्याने या रस्त्यावरील कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होतांना दिसून येत आहे.

👉 जिल्ह्यात "मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण" योजनेची विशेष मोहीम 

समृद्धी महामार्गावर सतत अपघाताच्या घटना घडत आहेत. यातच महामार्गावर पडलेल्या भेगा आणि खड्यांमुळे अपघाताच्या घटनेत आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यासंदर्भात स्थानिक ग्रामस्थांनी चार दिवसांपूर्वीच प्रशासनाकडे तक्रार केली. 

👉 शिर्डीत हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश ... 

मात्र, प्रशासनाने अद्यापही कोणती दखल घेतली नसल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्राचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून समृद्धी महामार्गाकडे पाहिले जाते. समृद्धी महामार्ग अद्याप मुंबईपर्यंत सुरूदेखील झाला नाही आणि वर्षभरातच अशी दुरवस्था झाली आहे तर, पुढे काय होणार असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे. 

👉 खा. नीलेश लंके विधानभवनाच्या पायऱ्यांवर नतमस्तक ! 

वर्षभरातच रस्त्याची दुरावस्था
मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग एकूण ७०१ किलोमीटरचा आहे. यापैकी आतापर्यंत ६२५ किलोमीटरचा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यावेळी एमएसआरडीसीने मोठा गाजावाजा करीत हा रास्ता चांगल्या पद्धतीने बनवण्यात आल्याचा दावा केला होता. परंतु, पहिल्याच पावसात समृद्धी महामार्गावर अशी दुरवस्था झाल्याने वाहनचालकांनी डोक्यावर हात मारला.


Post a Comment

Previous Post Next Post