शरद पवारांच्या भेटीचे कारण भुजबळांकडून स्पष्ट


| मुंबई | दि.15 जुलै २०२४ | राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ हे अचानक  शरद पवारांच्या भेटीला गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं, छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट का घेतली असावी याबाबत अनेक तर्क वितार्काना सुरवात झाली होती मात्र, ही भेट कशासाठी याचे भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेवून मुद्दे स्पष्टच केले.

भुजबळ पुढे म्हणाले की, मराठा, ओबीसी नेत्यांमध्ये काय चर्चा होते हे मला माहिती नाहीत असं शरद पवार म्हणाले आहेत. त्यामुळे येत्या दोन तिन दिवसांत मी मुख्यमंत्र्यांना फोन करून चर्चा करेन, असं शरद पवार म्हणाले असल्याचं भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. येत्या काळात सर्वपक्षीय बैठक घेण्याचं त्यांना सुचवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

* शरद पवार छगन भुजबळ यांची आरक्षण विषयावर दिड तास चर्चा.

* शरद पवारांना भेटण्या अगोदर अजित पवारांशी चर्चा नाही.

* मी आरक्षणाचा प्रश्न मिटवण्यासाठी कुणालाही भेटण्यास तयार.

* पवारांच्या भेटीसाठी प्रफुल्ल पटेलांशी केली चर्चा.

* आजची भेट राजकीय नव्हती. हा राजकारणाचा विषय नाही.

* मी पुढाकार घेईल असे आश्वासन पवारांनी दिल्याचे भुजबळ सांगितले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post