विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ॲड. प्रताप ढाकणे यांना विधानसभेत पाठवा.: खा.लंके
ॲड. प्रताप ढाकणे यांचा वाढदिवस थाटात साजरा
गायक आनंद शिंदे यांच्या शिंदेशाहीला श्रोत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
ॲड. प्रताप ढाकणे यांचा वाढदिवस थाटात साजरा
गायक आनंद शिंदे यांच्या शिंदेशाहीला श्रोत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद
| अहमदनगर | दि.24 जुलै 2024 | शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी ॲड. प्रतापराव ढाकणे यांना विधानसभेवर पाठवा, असे आवाहन अहमदनगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी केले.
शेवगाव - पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे संभाव्य उमेदवार ॲड. प्रतापराव ढाकणे यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. खंडोबा मैदानावर झालेल्या कार्यक्रमास ॲड. प्रतापराव ढाकणे, जिल्हा परिषद सदस्य प्रभावती ढाकणे, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष ॲड. दिनकरराव पालवे, शिवसेना (उबाठा) नेते रामदास गोल्हार, राष्ट्रवादीचे पाथर्डी तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शेवगाव तालुका अध्यक्ष हरीश भारदे, केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ऋषिकेश ढाकणे, शेवगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष वजीर पठाण, माजी उपसरपंच एजाज काझी, राहुल मगरे, माधव काटे यांच्यासह शेवगाव पाथर्डी तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना खा. निलेश लंके म्हणाले, ॲड. प्रताप काका ढाकणे हे अत्यंत निर्मळ मनाचे नेते आहेत. त्यांना या वाढदिवसानिमित्त दुसरी कुठली भेट न देता त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत मुंबईला विधानसभेत पाठवा. प्रत्येकाने आपण स्वतःच विधानसभेचे उमेदवार आहोत अशी खून गाठ बांधा. कार्यकर्त्यांमध्ये जेव्हा चैतन्य निर्माण होते. तेव्हा कुठलीही गोष्ट अशक्य नसते. संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा चालवणाऱ्या ॲड. प्रतापराव ढाकणे यांनी आपले आयुष्य जनतेच्या सेवेसाठी वाहून घेतले आहे. अशा या सर्वसामान्य जनतेसाठी लढणाऱ्या माणसाला तुम्ही जपा असे ते म्हणाले.
Tags:
Ahmednagar
