। राहुरी । 15 मे 2024 । अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील अति महत्व प्राप्त झालेल्या राहुरी मतदार संघात अंदाजे ७० टक्के मतदान झाले असल्याचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शाहूराव मोरे यांनी माहिती दिली.
राहुरी शहरात प्रगती विद्यालयाच्या केंद्रावर पोलीस उपनिरीक्षक किरण मगदूम यांनी दिव्यांग मतदाराला घेऊन जाणाऱ्या एका कार्यकर्त्यावर अनावश्यक तोंडसुख घेतले. त्यामुळे बाचाबाची झाली. मतदानासाठी आलेले आ. प्राजक्त तनपुरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांनी मध्यस्थी करून या वादावर पडदा टाकला. तर येथील एक महिला पोलीस कर्मचाऱ्याने अनेक मतदार रांगेत उभे असताना मोठा आरडाओरड करत त्यांच्यावर तोंड सुख घेतल्याचेही निर्दशनास आले आहे. यावेळी मतदारांनी नाराजी व्यक्त केली.
१७८ मतदान केंद्र, नगर तालुक्यातील २४ गावांमध्ये ७० मतदान केंद्र व पाथर्डी तालुक्यातील ३८ गावांमध्ये ५९ मतदान केंद्र असे एकूण १२६ गावांमध्ये ३०७ मतदान केंद्रावर मतदान झाले. सकाळी ७ वाजता उत्साहात मतदानाला सुरुवात झाली. ७ ते ९ यावेळेत ४.५ टक्के मतदान झाले. सकाळी नऊनंतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या. दुपारी एक वाजेपर्यंत २९.०१ टक्के, दुपारी तीन वाजेपर्यंत ४५.८ टक्के मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत ५६.९६ टक्के मतदान झाले. यामध्ये पुरुष एक लाख ६३ हजार ०४१ तर महिला एक लाख ४८ हजार ७०३ यांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये मतदार 3 लाख १४ हजार ७४५ यामध्ये मतदानाची आकडेवारी ६९,७९% सरासरी मतदान झाले आहे.
शिलेगावमध्ये शांततेत मतदान झाले. परंतु दुपारी १.३० वाजता बोगस मतदान करण्यावरून दोन्ही गटांमध्ये संघर्ष झाला. अखेर पोलीस यंत्रणा येतात वातावरण निवळले परंतु, परत संध्याकाळी लंके समर्थक मतदान करण्यासाठी आले असता ते बोगस मतदान होऊ दिले नाही .
मानोरी व इतर तीन ठिकाणी ईव्हीएम मशीन बिघाड झाला होता परंतु तात्काळ व्यवस्थित झाल्याने मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली सायंकाळी ५ नंतरही काही मतदान केंद्रावर मोठ्या प्रमाणात रांगा होते सायंकाळी ६ वाजता पर्यंत आलेल्या मतदान होण्यासाठी आठ वाजले होते.
