। अहमदनगर । दि.01 ऑगस्ट 2023 । दुचाकीवरुन घराकडे जाणार्यां महिलेच्या गळ्यामधील मिनीगंठण दोन अनोळखी चोरट्यांनी ओरबडून नेले. ही घटना रेल्वे स्टेशन जवळल छायानगर परिसरात शनिवारी सायंकाळी 7 च्या सुमारास घडली आहे.
चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील ओरबडून नेलेले मिनीगंठण दीड तोळ्याचे होते. याप्रकरणी प्रिया मुकुंद जव्हर (वय 35, रा.लक्ष्मी कृपा हौसिंग सोयायटी, रेल्वे स्टेशन, नगर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. यावरुन दोन अनोळखी विरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी सायंकाळी सात वाजता प्रिया प्रिया मुकुंद जव्हर त्यांच्या मुलांना घेऊन दुचाकीवरुन पुस्तक घेण्यासाठी गेल्या होत्या. त्या पुन्हा घराकडे येत असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आला. त्या फोनवर बोलत असताना समोरुन दोन व्यक्ती आले.
त्यातील एकाने त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु फोन सुरु असल्याने त्यांनी लक्ष दिले नाही. त्याच दरम्यान दुचाकीच्या पाठीमागील व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मिनीगंठण ओरबडले. गंठणचा काही भाग खाली पडला व काही भाग चोरटे घेऊन पसार झाले.
Tags:
Ahmednagar
