शरद पवार अचानक मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीला

। मुंबई  । दि.02 जून । काल राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी वर्षावर जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीबाबत अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मात्र या भेटीबाबत पवारांनी ट्विट करून आपण मुख्यमंत्र्यांना एका कार्यक्रमाचे निमंत्रण द्यायला गेलो होतो, असे स्पष्ट केले आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा ज्येष्ठ नेते शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून पवार वर्षावर पहिल्यांदाच त्यांच्या भेटीसाठी गेले होते. बंद दाराआड दोघांमध्ये जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा झाली. 

------

💥 पंढरीच्या आषाढी वारीसाठी चोख नियोजन करावे : मुख्यमंत्री 

💥 अहमदनगर महाविद्यालयाचा इ. १२ वी चा ९४.०९ टक्के निकाल

💥  पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मिनीगंठण लांबविले 

Post a Comment

Previous Post Next Post