पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मिनीगंठण लांबविले


। अहमदनगर। दि.01 जून । घराच्या परिसरातच रस्त्यावर मॉर्निंग वॉक करणार्या महिलेला मोटारसायकलवर आलेल्या दोघांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने बोलण्यात गुंतवून तिच्या गळ्यातील सव्वा दोन तोळे वजनाचे मिनीगंठण हिसका मारुन तोडून नेल्याची घटना मंगळवारी (दि.30) सकाळी 6.45 च्या सुमारास गुलमोहोर रोडवरील दळवी मळा परिसरात घडली.

रस्ते घोटाळा प्रकरणी आत्मदहन करण्यापूर्वीच किरण काळेंना पोलिसांनी घेतले ताब्यात

याबाबत द्वारका रामभाऊ ठाणगे (वय 60, रा.ओंकार बंगला, सर्वोदय कॉलनी, दळवी मळा, गुलमोहोर रोड) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी ठाणगे या नेहमीप्रमाणे मंगळवारी (दि.30) सकाळी घराच्या परिसरातच रस्त्यावर मॉर्निंग वॉक करत असताना एका मोटारसायकलवर 2 अनोळखी इसम त्यांच्याजवळ आले.

राज्यात आजपासून उन्हाळी कांदा नाफेड मार्फत खरेदीचा शुभारंभ : केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार

त्यातील पाठीमागे बसलेल्या इसमाने खाली उतरुन त्यांच्याजवळ हातात चिठ्ठी दाखवून ‘हा पत्ता कोठे आहे’ अशी विचारणा केली. त्यावर ‘मला चष्मा नसल्याने दिसत नाही’, असे त्या म्हणाल्या. त्यावेळी त्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्या गळ्यातील 2 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मिनीगंठण त्या इसमाने हिसका मारुन तोडले व मोटारसायकलवर बसून ते पसार झाले.

अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देणार : मुख्यमंत्री

यावेळी फिर्यादी ठाणगे यांनी आरडाओरडा केला. त्यावेळी काही नागरिकांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र ते भरधाव वेगात एकवीरा चौकाकडे पसार झाले. त्यानंतर ठाणगे यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात येवून फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन दोन चोरट्यांविरुद्ध भा.दं.वि.क. 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक करण्यासाठी क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट 

Post a Comment

Previous Post Next Post