काँग्रेसचे महाराष्ट्रातील खासदार खासदार बाळू धानोरकर यांचे निधन

। चंद्रपूर । दि.30 मे 2023 । चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील आणि काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांचे आज सकाळी उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या अवघ्या ४७ व्या वर्षी किडनी स्टोनसारख्या आजारावर उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवल्याने राज्य व काँग्रेस पक्षावर शोककळा पसरली आहे. बाळू धानोरकर यांच्या पश्चात पत्नी आमदार प्रतिभा, दोन मुले असा परिवार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर किडनीसंबंधी आजारासाठी नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. तिथे त्यांच्यावर किडनी स्टोन शस्त्रक्रियाही झाली. परंतु शस्त्रक्रियेदरम्यान प्रकृती खालावत गेल्याने २८ मे ला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे त्यांना नागपूरहून दिल्लीत उपचारांसाठी हलवण्यात आले. दिल्लीतील मेदांता रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर, आज मध्यरात्री सव्वादोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.

-----

प्रवासादरम्यान महिलेचे सोन्याचे दागिने लंपास  

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

कृषि केंद्रांवर कृषि विभागाची करडी नजर 

Post a Comment

Previous Post Next Post