प्रवासादरम्यान महिलेचे सोन्याचे दागिने लंपास


। अहमदनगर । दि.30 मे 2023 ।  बस प्रवासाच्या दरम्यान एका महिलेच्या बॅगमधून पाच तोळ्यांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली. या प्रकरणी राजश्री संदीप शिंदे (वय 28, रा.काळेगाव फकीर ता.पाथर्डी, हल्ली रा.श्रीरंगनगर, नवनागापूर) यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्याविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

माहिती अशी की, फिर्यादी शिंदे या दि.15 मे रोजी नगरवरुन चापडगाव येथे नातेवाईकाच्या लग्नाकरिता गेल्या होत्या. दि.16 मे रोजी हे लग्न झाले. त्यानंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे 17 मे रोजी त्या नगरला येण्यासाठी चापडगाव येथून गेवराई-नगर बसमध्ये बसल्या.

मृत्यू पावलेल्या कामगाराच्या वारसांना रु. १५ लाखांची मदत मिळावी : काळे

सदर लग्नाकरिता शिंदे यांनी पाच तोळ्याचे दागिने नेले होते. ते नगरला येताच बॅगमध्ये छोट्या पाकिटामध्ये ठेवले होते. माळीवाडा बस स्थानकावर आल्यानंतर त्यांनी फोन लावण्यासाठी बॅगमधील मोबाईल पाहिला असता सोन्याचे दागिने दिसले नाही. यानंतर त्यांनी आई - वडिलांनां फोन करुन कळविले.

कृषि केंद्रांवर कृषि विभागाची करडी नजर

सोन्याचे दागिन्यांचे पाकिट बॅगमधून चापडगाव ते नगर प्रवासादरम्यान अज्ञाच तोट्याने चोरुन नेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यात वेल, 5 गॅ्रमची अंगठी, 20 ग्रॅमचे डोरले असा सुमारे पाच तोळ्यांचा ऐवज चोरीला गेला आहे. याप्रकरणी चोरीचा गुन्हा कोतवाली पोलिसात दाखल करण्यात आला.

निळवंडे धरणातून ३१ मे रोजी पाणी सोडण्याची चाचणी : महसूलमंत्री

सरकारने महिलांना एसटी प्रवास अर्धे तिकीटात केल्याने बसमधून प्रवास करणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे. मात्र यात गर्दीचा फायदा घेत चोरटे देखील सक्रिय झाले असून महिलांच्या दागिन्यांकडे चोरट्यांनी मोर्चा वळवीला असल्याची चर्चा सध्या होत आहे.

व्ही.आय.पी. शासकीय विश्रामगृहाच्या इमारतीचे भूमिपूजन 

 

Post a Comment

Previous Post Next Post