संगीत शिक्षणामुळे आत्मशांती प्राप्त होते : डॉ. संदीप दलाल
आंतरराष्टीय संगीतकार डॉ.श्री. संदीप दलाल यांचे सहजयोग परिराच्या वतीने सन्मान
। अहमदनगर । दि.31 मे 2023 । प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग परिवारातील अमरावती येथील आंतरराष्ट्रीय संगीतकार व कला वैभव संगीत अकादमी चे अध्यक्ष डॉ.श्री संदीप दलाल यांचे सन्मान अहमदनगर जिल्हा सहजयोग परिवाराच्या वतीने मा. नगरसेविका सौ. वीणा बोज्जा व अहमदनगर जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांचे हस्ते सन्मान करण्यात आले. या वेळी सहजयोगी कुंडलिक ढाकणे, सौ. छाया ढाकणे, सौ. दलाल, अथर्व बोज्जा, कार्तिक ढाकणे व पूर्वजा बोज्जा उपस्थित होते.
या वेळी बोलतांना डॉ. संदीप दलाल म्हणाले, संगीत हा जीवनातला अविभाज्य घटक आहे. संगीताचे कार्य हे ईश्वरी कार्य असून याचे शिक्षण जास्तीत जास्त साधकांनी घ्यावे. मन शांती साठी संगीताचे शिक्षण घेणे गरजेचे आहे.
या वेळी अहमदनगर सहजयोग जिल्हा समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी श्री संदीप दलाल यांच्या बाबत माहिती देतांना सांगितले की, दलाल यांनी एम ए, बी एड, पी एचडी संगीत अलंकार शिक्षण घेतलेले आहे. तसेच शास्त्रीय संगीत व तबल्या मध्ये अलंकार ही पदवी धारण केलेले असून कला वैभव संगीत अकादमी चे अध्यक्ष म्हणून काम करीत असून सदर संगीत अकॅडमी ला गेल्या तीन पिढ्यांचा वारसा लाभला आहे.
संपूर्ण भारत व परदेशातील 20 पेक्षा जास्त देशात संगीत शिकवण्याचे कार्य केलेले असून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील आदिवासी मुलांना संगीत शिकवण्याचे कार्य करीत आहेत.
या कार्यक्रमाचे स्वागत कुंडलिक ढाकणे यांनी केले, तर आभार अथर्व बोज्जा यांनी मानले.
Tags:
Ahmednagar
