राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद : आ. जगताप

राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे  कार्य कौतुकास्पद : आ. जगताप

एकल महिलांना शिलाई मशिनचे वाटप


। अहमदनगर । दि.16 मे 2023 । राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणच्या वतीने स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त मराठा समाजातील एकल महिलांना शिलाई मशीनचे वाटप व समाजातील विविध क्षेत्रात नैपुण्य प्राप्त करणार्‍या विद्यार्थ्यांचा व गुणवंतांचा सन्मान आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.

या कार्यक्रमास माजी महापौर बाबासाहेब वाकळे,  माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी उपमहापौर  अनिल बोरुडे, माजी नगरसेवक  दगडू  पवार, निखिल वारे, बाळासाहेब पवार, माणिकराव विधाते, शिवाजी कराळे, प्रकाश कराळे, डॉ.अविनाश मोरे, सुरेश बनसोडे, किशोर मरकड आदी  उपस्थित होते.  यावेळी शिवकालीन शस्त्राचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आली. आरोही दगडे हिने शिवगारद सादर केली.

आ. जगताप म्हणाले की,  समाजातील एकल महिलांना शिलाई मशिनचे  वाटप करून राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणने गरजू महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा व त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्याचा केलेला  प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे व गुणवंतांचा सत्कार करणे असे कार्यक्रम करून प्रतिष्ठाणने अत्यंत चांगला पायंडा पाडला आहे.

जिजाऊ प्रतिष्ठाणचे हे पहिलेच वर्ष असून यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त देखील शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले होते. ते पुढे  म्हणाले की राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाण जरी नवीन असले तरी यातील सदस्य अत्यंत अनुभवी व सातत्याने समाजातील गरजू लोकांच्या मदतीला धावून जाणारे आहेत. प्रतिष्ठाणचे सर्वच सदस्य मोठा संघर्ष करून समाजसेवा करीत आहेत.  त्यांचे मला कौतुक वाटते.

यावेळी राजमाता जिजाऊ प्रतिष्ठाणचे उद्योजक संजय चव्हाण, राजेंद्र ससे, निलेश  म्हसे, प्रशांत गंधे, सुहास जरे, रवि भुतकर, अजय दिघे, रामदास वाघ, सचिन जगताप,  मिलींद जपे, अ‍ॅड. चेतन रोहकले, अ‍ॅड. मंगेश सोले, महेश खिलारी,  महेश  बागल, डॉ.अविनाश मोरे, यश ससे, राजेंद्र देशमुख, राजेंद्र  कर्डिले, नितीन शेळके, वैभव शिंदे, यशवंत तोडमल, शंतनु पांडव, मिलींद भालसिंग, संदीप जगताप, विनायक भुतकर, 

हेमंत मुळे, राजेंद्र सरमाने, श्रीपाद दगडे, हेमंत भुतकर, शैलेश  गवळी, नितीन साळुंखे, अहमदनगर जिल्हा  मराठा  सेवा  नागरी  सहकारी पतसंस्थेचे नुतन संचालक बापुसाहेब  राजेभोसले, लक्ष्मण सोनाळे, किशोर मरकड, उदय अनभुले, अतुल लहारे,  दत्ता साठे, धर्मेद्र गिते, आदीसह समाजातील विविध स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका शेळके पाटील यांनी केले. 

Post a Comment

Previous Post Next Post