स्नेहबंध ने ऐतिहासिक वास्तुंच्या प्रतिमा देऊन शहराचा वारसा जपला
स्थापना दिनानिमित्त ब्रिगेडियर डिसूजा यांना फराहबक्ष महालाची प्रतिमा भेट
। अहमदनगर । दि.31 मे 2023 । नगरचा ऐतिहासिक वारसा व मागील ५३४ वर्षांचा इतिहास विविध शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न स्नेहबंध सोशल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी केला आहे. नगरच्या ऐतिहासिक वास्तूंची छायाचित्रे काढून ती शहर स्थापना दिनानिमित्त नगर शहरातील विविध उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना भेट देत. यातून आपल्या शहरास असलेला ऐतिहासिक वारसा वेगळ्या रूपात जीवंत ठेवण्याचे काम डॉ. शिंदे यांनी केले.
राष्ट्रवादीच्या बैठकीत दक्षिणेतील उमेदवार घोषित करण्याची मागणी
छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडियर रसल डिसूजा यांना स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे नगर शहर स्थापना दिनानिमित्त निजामशाहीतील जलमहाल आणि गार्डन पॅव्हॅलियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक फराहबक्ष महालाची प्रतिमा भेट दिली. यावेळी छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे उपस्थित होते.
नगर दक्षिणेतून माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरातांनी काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करावी : किरण काळे
नगर शहर व जिल्ह्यात अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत. भुईकोट किल्ला, चांदबिबी महाल, फराहबक्ष महाल, बेहस्तबाग महल, दमडी मशीद ही ठिकाणे प्रसिद्ध आहेत. दगडी बांधकामातील जुन्या ऐतिहासिक वास्तू भग्नावस्थेत पोहोचल्या तरी तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटनांची साक्ष मात्र त्या देतातच. हा ऐतिहासिक वारसा जतन रहावा यासाठी गेल्या पाच वर्षांपासून स्नेहबंधचे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे यांनी शहरातील विविध शासकीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना शहर व परिसरात असलेल्या ऐतिहासिक वास्तुंची प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
न्या. रमेश धानुका यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ
इतिहास नेहमीच प्रेरणादायी मानला जातो. काही जण तो पुस्तकबद्ध करतात, ग्रंथ लिहितात, संशोधन करतात. तर काही कलावंत आपल्या कलेतून तो जगासमोर विलोभनीय स्वरूपात मांडतात. अशाच प्रयत्न डॉ. उद्धव शिंदे करत आहेत. नगरकरांची ऐतिहासिक वास्तू दर्शनाची ओढ या छायाचित्रांनी जागवल्याचे म्हटले तर वावगे ठरणारे नाही.
निळवंडे धरणातून ३१ मे रोजी पाणी सोडण्याची चाचणी : महसूलमंत्री
