। अहमदनगर । दि.30 मार्च । रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला दुचाकी आदळून झालेल्या अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला. आशिष शंकर कदम (वय 23 रा. मांजरसुंबा ता. नगर) असे मयत युवकाचे नाव आहे. सोमवारी (दिनांक 22 मार्च) रात्री 10 वाजता डोंगरगण ते मांजरसुंबा रोडवर गणपती मंदिराजवळ हा अपघात झाला.
शेतकऱ्यांनी कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत अर्ज करण्याचे पणन संचालकांचे आवाहन
याप्रकरणी काशिनाथ एकनाथ पठारे (रा. डोंगरगण) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर महिपती कदम (वय 50 रा. मांजरसुंबा) यांनी फिर्याद दिली आहे. पठारेचा ट्रॅक्टर डोंगरगण ते मांजरसुंबा जाणार्या रोडवर गणपती मंदिराजवळ पंक्चर झाल्याने त्याने तो तेथेच उभा केला होता. त्याला इंटिगेटर्स अगर रिफलेक्ट्रर लावलेले नव्हते.
खासदार गिरीश बापट यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
दरम्यान आशिष कदम हा सोमवारी रात्री 10 वाजता त्याच्या दुचाकीवरून तेथून जात असताना त्याची दुचाकी ट्रॅक्टरवर आदळून अपघात झाला. या अपघातात आशिष कदम याचा मृत्यू झाला आहे. अधिक तपास पोलीस अंमलदार दीपक गांगर्डे करीत आहेत.
